Rane Brothers Rane Brothers
ताज्या बातम्या

Rane Brothers : भाजप पदाधिकाऱ्याचं स्टिंग ऑपरेशन अन् कोकणात राणे बंधूंमध्ये जुंपली

शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी 26 नोव्हेंबर रोजी मालवणमधील भाजपचे पदाधिकारी विजय किनवडेकर यांच्या राहत्या घरी स्टिंग ऑपरेशन करत त्यांच्या घरी अवैध आणि हिशोबी नसलेली मोठी रक्कम आढळून आली असल्याचा दावा केला आहे.

Published by : Riddhi Vanne

सध्या राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून मोठा राजकीय राडा कोकणमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटात पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी 26 नोव्हेंबर रोजी मालवणमधील भाजपचे पदाधिकारी विजय किनवडेकर यांच्या राहत्या घरी स्टिंग ऑपरेशन करत त्यांच्या घरी अवैध आणि हिशोबी नसलेली मोठी रक्कम आढळून आली असल्याचा दावा केला आहे. भाजप पदाधिकारी विजय किनवडेकर यांच्या घरी बेहिशोबी 25 लाख रुपये मिळाले असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मालवण दौऱ्यानंतर वेगाने पैसे वाटपाची पद्धत सुरु झाली असल्याचा आरोप देखील निलेश राणे यांनी केला.

पैसे वाटप करुन निवडणूक लढवण्याची पद्धत आहे का? मैदानात येऊन लढा, त्या घरात अजून पैशाच्या बॅग आहेत असं म्हणत निलेश राणे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. तर भाजपचे कार्यकर्ते कोण कोण पैसे वाटप करतात, याची यादी देणार असून पप्पा तवटे, रुपेश कानडे, रणजीत देसाई, मोहन सावंत अंगावर पैसे घेऊन वाटत आहे त्यांच्याकडे रोज पैशाची बॅग पोहोचवण्यासाठी यंत्रणा तयार असल्याचा दावा देखील शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी केला. तर आता या प्रकरणात राज्याचे मंत्री आणि भाजपचे आमदार निलेश राणे यांची देखील एन्ट्री झाली असून त्यांनी आमदार निलेश राणे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

राज्यातील कानाकोपऱ्यात रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) भाजपाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांना जावं लागतं. राजकीय चष्म्याने त्याला पाहावं. उद्या आम्ही मंत्री उदय सामंत यांच्याबद्दल बोललो आणि असा धिंगाणा घातला तर? मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी असा सवाल उपस्थित केला.

या प्रकरणात कणकवलीमध्ये पुढे बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, आमचे स्वतःचे व्यवसायही आहेत. आमच्या घरासाठी पैसे ठेवणे चुकीचे आहे का? कोणीही आमच्या पक्षाची बदनामी करू नये. सर्व काही व्यवसायात आहे. जो नियम आम्हाला लागतो तो नियम सगळ्यांना लागणार हमाम मैं सब नंगे है असं म्हणत त्यांनी निलेश राणे यांना प्रत्युत्तर दिले.

तर दुसरीकडे आज या प्रकरणाचा अपडेट घेण्यासाठी आमदार निलेश राणे मालवण नगरपालिकेत पोहचले होते. यावेळी त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना जाब विचारत पैसे ज्यांच्याकडे मिळाले त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. तसेच या प्रकरणात त्यांनी एफआयआर दाखल होणार का? असा प्रश्न देखील विचारला. यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांनी सविस्तर अहवाल जिल्हा मुख्य निवडणूक आयोगाकडे पाठवल्याचं सांगत कारवाई करणार असा शब्द दिला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा