ताज्या बातम्या

MNS Invites BJP : 'उबाठा गटासोबत चर्चेत सहभागी होऊन काय साध्य होईल?'; म्हणत भाजपनं मनसेचं आमंत्रण नाकारलं

मसेनेकडून आज प्रतिपालिका सभागृह आयोजित करण्यात आले आहे.

Published by : Rashmi Mane

मसेनेकडून आज, 26 एप्रिल प्रतिपालिका सभागृह आयोजित करण्यात आले आहे. मुंबई महापालिकेच्या समोरील पत्रकार भवन येथे मनसे ही प्रतिसभागृह भरवणार आहे. लोकप्रतिनिधी नसल्यामुळे लोकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. त्यामुळे प्रतिपालिका सभागृह भरवून या समस्यांकडे मनसे लक्ष वेधणार आहे. यासाठी मनसेने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित केले असून ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांना पत्र लिहून आमंत्रण दिले होते. मात्र मनसेच्या आमंत्रणाला भाजपने नकार दिला आहे. शिवसेना ठाकरे गटालाही प्रतिसभागृहासाठी मनसेने आमंत्रित केल्याने भाजपने सहभागी होण्यास नकार दिला असून तसे त्यांनी पत्राद्वारे कळवले आहे.

काय म्हटले आहे मनसेनं निमंत्रण पत्रात ?

मुंबई महानगरपालिका ही दोन चाकांवर चालते. एक प्रशासन आणि एक लोकप्रतिनिधी, पण गेल्या तीन वर्षांपासून यातील लोकयतिनिधी हे चाक बंद झाले आहे. मुंबईत अनेक समस्या आहेत, ज्यावर चर्चा व्हावी, मार्ग निघावा अशी जनभावना आहे. पण महापालिका सभागृह अस्तित्वात नसल्यामुळे ह्या पर्चा होत नाहीत. त्यामुळे ह्या सर्व प्रश्नांवर चर्चा पडवून आणण्यासाठी आम्ही प्रतिसभागृहाची संकल्पना मांडत आहोत. ज्यामध्ये विविध राजकीय संकटना, राजकीय प्रतिनिधी यांनी सहभाग नोंदवावा अशी अपेक्षा आहे. नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांना वाचा फुटावी. महानगरपालिका प्रशासनाला या प्रश्नांची जाणीव व्हावी व त्यावर मार्ग निघावा यासाठी हे चर्चचे व्यासपीठ आहे. राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून फक्त नागरिकांच्या समस्यांवर चर्चा व्हावी हा उद्देश आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींनी घाईघाईने निर्णय घेऊ नका, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Meenatai Thackeray Statue : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Latest Marathi News Update live : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत