Oros Gram Panchayat Team Lokshahi
ताज्या बातम्या

ओरोस ग्रामपंचायतीवर भाजपचा सरपंच

नगरपंचायतीचे स्वप्न पाहणाऱ्या ओरोस ग्रामपंचायतीवर भाजपच्या सरपंच आशा मुरमुरे तर उपसरपंचपदी भाजपचा युवा कार्यकर्ता गौरव उर्फ महादेव घाडीगावकर!

Published by : shweta walge

प्रसाद पाताडे, सिंधुदुर्ग : ओरोस ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी आशा मुरमुरे यांची निवड झाल्यानंतर आता या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी गौरव घाडी या नवयुवक उंमद्या नेतृत्वाची निवड झाली आहे. गौरव घाडी हे वयाने लहान असले तरी राजकीय प्रवासात दाखवलेली झलक फार मोठी आहे. नगरपंचायतीकडे वाटचाल करणाऱ्या या ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली निवडून येत उपसरपंच पदी मारलेली मजल गाव विकासाच्या दृष्टीने कौतुकास्पद मानली जात आहे.

नगरपंचायतीचे स्वप्न पहाणार्‍या ओरोस ग्रामपंचायतीवर ओेरोस सह सिंधुनगरी वासीयांनी भाजपच्या बाजूने निर्विवाद कौल दिला आहे. भाजप सरपंच आशा गजानन मुरमुरे यांच्यासह १३ पैकी १० भाजप सदस्यांना मतदारांनी मताधिक्याने निवडून दिले होते. भाजप सोबत युती झालेले शिंदे शिवसेना गटाचे प्रकाश देसाई यांनाही विजयाची संधी मिळाली होती. भाजपचे संतोष वालावलकर व सुप्रिया वालावलकर ही उभयता या विजयाचे शिल्पकार ठरले होते.

या ओरोस सिंधुनगरी ग्रामपंचायतीवर नव तरुण सदस्य म्हणून सव्वीस वर्षिय गौरव बाळा घाडिगावकर यांचा विजय लक्षवेधी मानला जात आहे. तर माजी सरपंच प्रिती देसाई यांचे पती प्रकाश देसाई यांनी शिंदे शिवसेना गटात जात भाजपशी प्रामाणिक युती केल्याने त्यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. तर शिवसेनेचे अमित भोगले व योगेश तावडे या तरुण सदस्याना या निवडणूकीत यश मिळाले.

प्रभाग एक मधून अमित भोगले(शिवसेना), पुजा मालवणकर (भाजप), प्रभाग दोन मधून (सिंधुनगरी) तेजश्री राऊळ (भाजप),सौ राजश्री राऊळ (भाजप), सौ भक्ती पळसंबकर(भाजप), प्रभाग तीन मधून सौ प्रिया आजगावकर(भाजप), गौरव घाडीगावकर(भाजप), सौ शमिका सावंत(भाजप), प्रभाग चार मधून योगेश तावडे (शिवसेना),पांडुरंग मालवणकर (भाजप), कु. रसिका वंजारे (भाजप), व प्रभाग ५ मधून सौ गौरी बोंद्रे (भाजप),व प्रकाश देसाई विजयी झाले होते. आता नवीन वर्षात सरपंच उपसरपंच यासह नवीन ग्रामपंचायत सदस्य या ग्रामपंचायतीचा कारभार हाकणार आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा