शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध वाढत आहे. एकीकडे शेतकऱ्यांकडून शक्तिपीठ महामार्गाविरोधात पुन्हा आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. तर दुसरीकडे शक्तिपीठ महामार्गाला भाजप खासदार अशोक चव्हाण यांचा विरोध पाहायला मिळत आहे. महामार्गामुळे मोठं नुकसान होणार असल्याचा शेतकऱ्यांनी आरोप केला आहे. येत्या 24 जानेवारीला 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
भाजप खासदार अशोक चव्हाण यांचा शक्तिपीठ महामार्गाला विरोध
शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांसोबतच भाजप खासदार अशोक चव्हाण यांनीही विरोध दर्शवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शेतकऱ्यांना भेटून यातून काही पर्यायी मार्ग काढता येईल का? हे पाहावं लागेल असं चव्हाण यांनी म्हटलं आहे. वर्धा ते गोवा असा हा महामार्ग असून या महामार्गामध्ये 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी महामार्गाला शेतकरी विरोध करीत आहेत. नांदेड मधून देखील हा महामार्ग जात असून या महामार्गाला नांदेड जिल्ह्यातील शेतकरी विरोध करीत आहेत.
काय म्हणाले अशोक चव्हाण?
जे काही ठरलं असेल त्याप्रमाणे होईल. मात्र, यामधून काय मार्ग काढता येईल ते पाहणार आहोत. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शेतकऱ्यांनाही भेटणार आहोत. यामध्ये काही पर्यायी मार्ग काढता येईल का, अलानमेंट काही बदलता येईल का याबाबतची शक्यता काय हे पाहणार असल्याचं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलं आहे.
शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध
शक्तिपीठ महामार्ग विदर्भातील वर्धा ते गोवा राज्याला जोडणारा असणार आहे. शक्तिपीठ महामार्ग राज्यातील बारा जिल्ह्यातून जाणार आहे. यामध्ये हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होत आहेत. साधारण 800 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग असणार आहे. हा शक्तिपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या कोणत्याही उपयोगाचा नसल्याचं म्हणत शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सविस्तर बातमी पाहण्यासाठी क्लिक करा-