Pravin Darekar - Uddhav Thackeray Team Lokshahi
ताज्या बातम्या

"शेपटावर पाय देऊन डिवचण्याचा प्रयत्न केल्यास..."; पत्रकार परिषदेतून भाजपचा इशारा

BJP Press Conference : पश्चिम बंगालपेक्षा भयावह स्थिती महाराष्ट्रात असल्याचं म्हणत महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप भाजपने केले आहेत.

Published by : Sudhir Kakde

मुंबई : भाजप नेत्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्यातील वेगवेगळ्या मुद्यांवरून शिवसेना (Shiv Sena) गुंडगिरी करत असल्याचा आरोप केला. भाजप नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्यावर झालेला हल्ला आणि राणा दाम्पत्याच्या घरी घुसलेले शिवसैनिक यावरून महाविकास आघाडीचं सरकार (MVA Government) या घटनांचं समर्थन करत असल्याचं म्हटलं आहे. पोलिसांच्या (Mumbai Police) डोळ्यासमोर हे सर्व सुरु असल्याचं म्हटलं आहे. आमच्या शेपटावर पाय ठेवून आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही शांत बसणार नाही असा इशार प्रविण दरेकर यांनी दिला.

लोकशाही मार्गाने ही गुंडगिरी थांबवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगत आम्ही मुंबई पोलिसांकडे याबद्दल निवेदन देणार आहोत असं सांगितलं. सरकारच्या माध्यमातून दहशत पसरवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आम्ही सहन करणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री या सर्व गोष्टींवर मुग गिळून गप्प बसले असून, ही राज्याच्या संस्कृतीला काळीमा फासणारी ही गोष्ट आहे असं प्रविण दरेकर म्हणाले.

भारतीय जनता पक्षाचा पोलखोल हा कार्यक्रम सर्व परवानग्या घेऊन सुरु आहे. सरकारच्या भ्रष्टाचाराबद्दल आम्ही त्यातून पोलखोल करत आहोत असं आशिष शेलार म्हणाले. लोकशाहीमध्ये अधिकृतरित्या सुरु असलेल्या कार्यक्रमात दंगा घालणं हे भ्याडपणाचं लक्षण आहे. भाजपच्या चेंबूर, सायन आणि अशा अनेक कार्यक्रमात जो दंगा घातला याला दंगेखोरपणा म्हणतात असं आशिष शेलार म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?