Sanjay Raut  Sanjay Raut
ताज्या बातम्या

Sanjay Raut : “भाजपला ठाण्यात शिंदेंचा पराभव करायचा” – संजय राऊतांची राजकीय खळबळ

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपने ठाण्यात स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत प्रचाराला सुरुवात केली आहे.

Published by : Riddhi Vanne

Sanjay Raut On Eknath Shinde : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपने ठाण्यात स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत प्रचाराला सुरुवात केली आहे. शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मोठे फलक लावण्यात आले असून “नमो भारत, नमो ठाणे” असा संदेश दिला जात आहे.

यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. भाजपला ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पराभव करायचा आहे, असा दावा त्यांनी केला. भाजपची सध्याची तयारी याच दिशेने सुरू असल्याचे राऊत म्हणाले.

दरम्यान, मुंबईतील शिवसेना भवनासमोर लागलेल्या वादग्रस्त बॅनरवरही राऊतांनी टीका केली. अशा प्रकारची बॅनरबाजी भाजपचीच पद्धत असल्याचे सांगत त्यांनी भाजपवर जोरदार शब्दांत हल्ला चढवला. महापालिका निवडणुका जवळ आल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

थोडक्यात

  1. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे.

  2. भाजपने ठाण्यात स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत प्रचाराला सुरुवात केली आहे.

  3. शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मोठे फलक लावण्यात आले असून “नमो भारत, नमो ठाणे” असा संदेश दिला जात आहे.

  4. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे.

  5. राऊतांच्या मते, भाजपला ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पराभव करायचा आहे.

  6. भाजपची सध्याची तयारी या दिशेने सुरू असल्याचे राऊतांनी सांगितले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा