BJP Protest Team Lokshahi
ताज्या बातम्या

भाजपचे आज राज्यव्यापी आंदोलन

भाजप विरूद्भ महाविकासआघाडी संघर्ष शिगेला

Published by : Vikrant Shinde

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (CM Uddhav Thackeray) 'मातोश्री' या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसाचे पठण करण्याच्या उद्दिष्टाने मुंबईच्या दाखल झालेल्या आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा (Ravi Rana & Navneet Rana) यांना दिवसभराच्या राजकीय नाट्यानंतर काल खार पोलिसांनी अटक केली. दरम्यान, ह्या दोघांची भेट घेऊन चौकशी करण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या हे खार पोलीस स्थानकात जात असताना संतप्त शिवसैनिकांनी सोमय्यांच्या गाडीवर दगडफेक केली.

राणा दाम्पत्याला भेटायला गेलेल्या किरीट सोमय्यांच्या गाडीची काच शिवसैनिकांनी फोडली. या हल्ल्यात किरीट सोमय्या जखमी झाले आहेत.

हया संपूर्ण घटनेमुळे भाजप विरूद्ध महाविकास (BJP Vs MVA Goverment) आघाडी सरकार हा संघर्ष चांगलाच वाढलेला पाहायला मिळतोय. सध्याच्या राजकीय परिस्थितीचा निषेध करण्यासाठी आज भाजपकडून राज्यभर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sanjay Rauat : "हे सरकार म्हणजे हवा भरलेले फुगे"; विजयी मेळाव्यानंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया

Uddhav Thackeray on Devendra Fadanvis : आंतरपाट दूर करणारे अनाजी पंत म्हणत उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर थेट निशाणा

Sanjay Shirsat On Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "पडझड ही उबाठा गटाची झाली, राज ठाकरेंची नाही"

Raj Thackeray On Devendra Fadnavis : "माझे वडील आणि काका इंग्रजीत शिकले पण..." फडणवीसांच्या टीकेला राज ठाकरेंकडून सडेतोड उत्तर