ताज्या बातम्या

अजित पवार गटाचा भाजपला धक्का

भाजप कार्यकर्त्यांचा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीत प्रवेश

Published by : shweta walge

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर राष्ट्रवादीत शरद पवार आणि अजित पवार गट असे दोन गट पडले. तर आता अजित पवार गटानेच भाजपलाच धक्का दिला आहे. भाजपचे माजी सरपंच आणि चार विद्यमान सदस्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

बीडच्या आष्टी तालुक्यातील हातुळ येथील भाजपचे माजी सरपंच आणि चार विद्यमान सदस्य राष्ट्रवादीच्या गळाला लागले आहेत. आमदार बाळासाहेब आजबे यांनी या सदस्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून घेतला आहे. जिल्ह्यात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचं वर्चस्व आहे. मात्र आता धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस आपलं वर्चस्व निर्माण करीत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Amravati News : अंधश्रद्धेचा कहर! 10 दिवसांच्या चिमुकल्याला गरम विळ्याचे 39 चटके अन्...

Banner In Front Of Sena Bhavan : विजयी मेळाव्यानंतर सेना भवनासमोर झळकले ठाकरे कुटुंबातील दोन पिढ्यांच्या फोटोचे बॅनर

Baramati Malegaon Election : माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अजित पवार, उपाध्यक्षपदी कोणाची निवड? जाणून घ्या...

Mahesh Manjrekar : 'यांच्या भावनांशी खेळलात, तर याद राखा...'; आज समजणार 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख