थोडक्यात
पालिका निवडणुकीसाठी भाजपचे युवा मैदानात
युवा मोर्चा १०० महाविद्यालयांमध्ये राबविणार अभियान
भाजप युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंह तिवाना यांनी दिली माहिती
"आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपाचा" अभियान राबविणार
युवा मतदारांना जोडण्याची भाजप युवा मोर्चाकडे विशेष जबाबदारी
भारतीय जनता पक्षाच्या वतीने मुंबईतील युवकांचा आवाज धोरणनिर्मितीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी “आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपाचा” हे अभियान राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली हे अभियान संपूर्ण मुंबईत पार पडणार आहे.
भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईच्या वतीने या अभियानांतर्गत येत्या गुरुवारी ६ नोव्हेंबरला मुंबईतील सर्व ३६ विधानसभा क्षेत्रांतील १०० महाविद्यालयांच्या परिसरात १८ ते २५ वयोगटातील तरुण-तरुणींना या अभियानाशी जोडले जाणार असून त्यांच्या विचारांचा व सूचनांचा संग्रह केला जाणार आहे. या अभियानाचा उद्देश तरुणांच्या कल्पना, विचार आणि स्वप्नांना शहराच्या विकासात व युवा सक्षमीकरणाच्या दिशेने समाविष्ट करणे हा आहे.
कसे असेल अभियान?
- भाजयुमो मुंबई, जिल्हा, मंडळ आणि वॉर्ड स्तरावरील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या अभियानात सक्रिय सहभाग घेतील.
- प्रत्येक महाविद्यालयात विद्यार्थ्यांना “स्वप्नातील मुंबई” या विषयावर आपले विचार मांडण्याची संधी दिली जाईल.
- या कल्पना व सूचना मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठीच्या भाजपाच्या जाहीरनाम्यात समाविष्ट केल्या जाणार आहेत.