Sham Manav Team Lokshahi
ताज्या बातम्या

Shyam Manav: नागपुरात श्याम मानव यांच्या कार्यक्रमात गोंधळ

नागपुरात श्याम मानव यांच्या कार्यक्रमात गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. नागपुरात श्याम मानवांच्या कार्यक्रमाला भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध दर्शवला.

Published by : Team Lokshahi

नागपुरात श्याम मानव यांच्या कार्यक्रमात गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. नागपुरात श्याम मानवांच्या कार्यक्रमाला भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध दर्शवला.

नागपूरात श्याम मानव यांच्या कार्यक्रमात राडा पाहायला मिळाला. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी गोंधळ घातल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे येथील परिस्थीती तणावाखाली असून पोलिसांना याठिकाणी हस्तक्षेप करावा लागला आहे. श्याम मानव हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक आहेत. यांनी 1983 मध्ये भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन केली. तेव्हापासून ते या समितीच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलनासंदर्भात काम करीत आहेत.

1987 ते 1989 दरम्यान त्यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकरही त्यांच्यासोबतही काम केले आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध अंधश्रद्धाविरोधी कार्यकर्ते आहेत. गेल्यावर्षी त्यांनी धीरेंद्र शास्त्री यांना आव्हान केले होते. जादूटोणा विरोधी कायदा आणण्यात श्याम मानव यांची भूमिका अत्यंत महत्वाची राहिली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Government Websites : सरकारी संकेतस्थळे आता मराठीत होणार

E Bike Taxi : राज्यात ई-बाईक टॅक्सी सुरू होणार; पहिल्या 1.5 किमीसाठी 15 रूपये भाडं

Latest Marathi News Update live : आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक

Accident : सिल्लोड तालुक्यातील अजिंठा घाटात अपघात