माजी मंत्री अस्लम शेख यांच्या विरोधात भाजप आक्रमक झाली आहे. शेख यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या विरोधात विधान केल्याने भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून मालवणी परिसरात जोरदार आंदोलन सुरू केले आहे. मुंबईच्या मालाड पश्चिमेकडील मालवणी परिसरात काँग्रेसचे नेते अस्लम शेख यांच्या विरोधात रविवारी भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले.
शनिवारी कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबई भाजपचे (BJP) अध्यक्ष अमित साटम यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले असताना रविवारी आता भाजपच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आक्रमकपणे आंदोलन केले. या वेळी मालवणी परिसरात आंदोलन करीत असलेल्या भाजपच्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी भाजपच्या नेतेमंडळीने जोरदार घोषणाबाजी केली.
माजी मंत्री अस्लम शेख (Aslam Shekh) यांच्या विरोधात भाजपच्या नेत्यांनी आक्रमकपणे घोषणाबाजी केली. यावेळी संतप्त झालेल्या भाजप कार्यकर्त्यांमुळे वातावरण तापले होते. या आंदोलनावेळी पोलीस आणि भाजपच्या कार्यकर्त्यात संघर्ष पाहवयास मिळाला. आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी शांत केले. मालवणी अग्निशमन जवळ असणाऱ्या असलम शेख यांच्या कार्यालयावर युवा मोर्चाच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात आले. मात्र, मुंबई पोलिसांकडून या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भाजप कार्यकर्ते देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने जमा झाले होते. या कार्यकर्त्यांकडून असलम शेख विरोधात घोषणाबाजी सुरू करण्यात आली आहे.