आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली असून, या यादीतून पक्षाची स्पष्ट राजकीय रणनीती समोर आली आहे. मुंबईसाठी भाजपने यावेळी उघडपणे ‘मराठी कार्ड’ खेळल्याचं चित्र दिसत आहे. जाहीर झालेल्या पहिल्या यादीत भाजपकडून एकूण ६८ उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली असून, त्यापैकी तब्बल ४६ उमेदवार मराठी आहेत. त्यामुळे हिंदी भाषेच्या सक्तीच्या मुद्द्यावरून विरोधकांच्या टीकेला सामोरे गेलेल्या भाजपने आता डॅमेज कंट्रोलसाठी मुंबई महापालिकेत मराठी मुद्द्यावर भर दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
भाजपच्या या पहिल्या यादीत सामाजिक आणि प्रादेशिक समतोल राखण्याचा प्रयत्न दिसून येतो. मराठी उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर संधी देत भाजपने मुंबईतील मराठी मतदारांना संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या रणनीतीला मतदारांचा नेमका कसा प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मराठी अस्मिता, स्थानिक मुद्दे आणि मुंबईतील बदलते राजकारण या पार्श्वभूमीवर भाजपचा हा डाव किती यशस्वी ठरतो, हे निवडणुकीत स्पष्ट होणार आहे.
विशेष म्हणजे भाजपच्या पहिल्या यादीत महिला उमेदवारांना मोठं प्रतिनिधित्व देण्यात आलं आहे. एकूण ६८ उमेदवारांपैकी ३७ महिला असून, ३१ पुरुष उमेदवारांचा समावेश आहे. महिला सशक्तीकरणाचा संदेश देण्याचा प्रयत्न भाजपने या माध्यमातून केला असल्याचं बोललं जात आहे.
या यादीत काही राजकीयदृष्ट्या चर्चेत असलेली नावंही आहेत. शिवसेना (उबाठा) चे माजी आमदार विनोद घोसाळकर यांची सून आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची पत्नी तेजस्वी घोसाळकर यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. तसेच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर आणि त्यांच्या पत्नी हर्षिता नार्वेकर यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय माजी आमदार राज पुरोहित यांचा मुलगा आकाश पुरोहित आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या यांचाही यादीत समावेश आहे.
एकीकडे मराठी कार्ड, तर दुसरीकडे घराणेशाहीवरून टीका होण्याची शक्यता—या दोन्ही मुद्द्यांमुळे भाजपची पहिली यादी चर्चेचा केंद्रबिंदू ठरली असून, आगामी महापालिका निवडणुकीत याचा नेमका परिणाम काय होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
भाजपने उमेदवारी दिलेले मराठी उमेदवार
वॉर्ड क्रमांक – २ – तेजस्वी घोसाळकर
वॉर्ड क्रमांक ७ – गणेश खणकर
वॉर्ड क्रमांक १० – जितेंद्र पटेल
वॉर्ड क्रमांक १४ – सीमा शिंदे
वॉर्ड क्रमांक १६ – श्वेता कोरगावकर
वॉर्ड क्रमांक १७ – शिल्पा सांगोरे
वॉर्ड क्रमांक १९ – दक्षता कवठणकर
वॉर्ड क्रमांक २० – बाळा तावडे
वॉर्ड क्रमांक ३७ – प्रतिभा शिंदे
वॉर्ड क्रमांक ४६ – योगिता कोळी
वॉर्ड क्रमांक ५२ – प्रीती साटम
वॉर्ड क्रमांक ५९ – योगिता दाभाडकर
वॉर्ड क्रमांक ६० – सयाली कुलकर्णी
वॉर्ड क्रमांक ६३ – रुपेश सावरकर
वॉर्ड क्रमांक ७४ – उज्ज्वला मोडक
वॉर्ड क्रमांक ७६ – प्रकाश मुसळे
वॉर्ड क्रमांक ८४ – अंजली सामंत
वॉर्ड क्रमांक ८५ – मिलिंद शिंदे
वॉर्ड क्रमांक ८७ – महेश पारकर
वॉर्ड क्रमांक ९९ – जितेंद्र राऊत
वॉर्ड क्रमांक १०० – स्वप्ना म्हात्रे
वॉर्ड क्रमांक १०३ – हेतल गाला मार्वेकर
वॉर्ड क्रमांक १०४ – प्रकाश गंगाधरे
वॉर्ड क्रमांक १०५ – अनिता वैती
वॉर्ड क्रमांक १०६ – प्रभाकर शिंदे
वॉर्ड क्रमांक १०८ – दिपिका घाग
वॉर्ड क्रमांक १११ – सारिका पवार
वॉर्ड क्रमांक ११६ – जागृती पाटील
वॉर्ड क्रमांक १२६ – अर्चना भालेराव
वॉर्ड क्रमांक १२७ – अलका भगत
वॉर्ड क्रमांक १२९ – अश्विनी मते
वॉर्ड क्रमांक १३५ – नवनाथ बन
वॉर्ड क्रमांक १४४ – बबलू पांचाळ
वॉर्ड क्रमांक १५२ – आशा मराठे
वॉर्ड क्रमांक १५४ – महादेव शिगवण
वॉर्ड क्रमांक – १७२ – राजश्री शिरोडकर
वॉर्ड क्रमांक १९० – शितल गंभीर देसाई
वॉर्ड क्रमांक १९५ – राजेश कांगणे (वरळी मतदारसंघ)
वॉर्ड क्रमांक १९६ – सोनाली सावंत
वॉर्ड क्रमांक २०७ – रोहिदास लोखंडे
वॉर्ड क्रमांक २१४ – अजय पाटील
वॉर्ड क्रमांक २१५ – संतोष ढोले
वॉर्ड क्रमांक २१८ – स्नेहल तेंडुलकर
वॉर्ड क्रमांक २१९ – सन्नी सानप
वॉर्ड क्रमांक २२६ – मकरंद नार्वेकर
वॉर्ड क्रमांक २२७ – हर्षिता नार्वेकर
भाजपचे अमराठी उमेदवार कोण?
वॉर्ड क्रमांक १३ – राणी त्रिवेदी
वॉर्ड क्रमांक १५ – जिग्ना शाह
वॉर्ड क्रमांक २३ – शिवकुमार झा
वॉर्ड क्रमांक २४ – स्वाती जैस्वाल
वॉर्ड क्रमांक ३१ – मनिषा यादव
वॉर्ड क्रमांक ३६ – सिद्धार्थ शर्मा
वॉर्ड क्रमांक ४३ – विनोद मिश्रा
वॉर्ड क्रमांक ४७ – तेजिंदर सिंह तिवाना
वॉर्ड क्रमांक ५७ – श्रीकला पिल्ले
वॉर्ड क्रमांक ५८ – संदीप पटेल
वॉर्ड क्रमांक ६८ – रोहन राठोड
वॉर्ड क्रमांक ६९ – सुधा सिंह
वॉर्ड क्रमांक ७० – अनिश मकवानी
वॉर्ड क्रमांक ७२ – ममता यादव
वॉर्ड क्रमांक ९७ – हेतल गाला
वॉर्ड क्रमांक १०७ – नील सोमय्या
वॉर्ड क्रमांक १२२ – चंदन शर्मा
वॉर्ड क्रमांक – १७४ – साक्षी कनोजिया
वॉर्ड क्रमांक १८५ – रवी राजा
वॉर्ड क्रमांक २२१ – आकाश पुरोहित