ताज्या बातम्या

Bjp : भाजपाला मोठा धक्का! लोह्याचे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादीच्या वाटेवर, नांदेडच्या राजकारणात खळबळ

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. भाजपाचे लोहा तालुका मंडळ अध्यक्ष आणि माजी उपनगराध्यक्ष शरद पवार यांनी भाजपाला रामराम देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

Published by : Riddhi Vanne

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. भाजपाचे लोहा तालुका मंडळ अध्यक्ष आणि माजी उपनगराध्यक्ष शरद पवार यांनी भाजपाला रामराम देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे भाजपाला मोठा धक्का बसला असून खासदार अशोक चव्हाण यांच्या गटासाठीही ही मोठी अडचण मानली जात आहे.

प्रताप पाटील चिखलीकर (NCP–Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत शरद पवार यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. स्थानिक राजकारणात पवार यांचा चांगला प्रभाव असून, ते भाजप नेते अशोक चव्हाण यांचे विश्वासू मानले जात होते. मात्र नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी अचानक बाजू बदलल्याने भाजपच्या रणनितीवर परिणाम होणार आहे.

लोहा नगरपरिषद निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर स्थानिक राजकारणात पक्षांतराची लाट दिसत आहे. अनेक ठिकाणी तिकीट न मिळण्याच्या शक्यतेमुळे नेते सोयीच्या पक्षात प्रवेश करत आहेत. त्या मालिकेत शरद पवार यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी (अजित गट)ला बळ मिळाले असून भाजपाला त्यांच्याइतका तोलामोलाचा नेता शोधावा लागणार आहे. या घडामोडीनंतर लोह्यातील निवडणूक आणखी चुरशीची होण्याची शक्यता आहे.

थोडक्यात

  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात मोठी राजकीय घडामोड घडली आहे.

  • शरद पवार यांनी भाजपाला रामराम देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला

  • भाजपाला मोठा धक्का बसला असून खासदार अशोक चव्हाण यांच्या गटासाठीही ही मोठी अडचण मानली जात आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा