ताज्या बातम्या

BJP : भाजपचे आजपासून ‘बहीण लाडकी भाऊबीज देवाभाऊंची’ कार्यक्रम

मुंबई भाजपच्या वतीने आजपासून मुंबईच्या सहा जिल्ह्यात ‘बहीण लाडकी भाऊबीज देवाभाऊंची’ हे महिला सशक्तीकरणाचे कार्यक्रम होणार आहेत.

Published by : Varsha Bhasmare

थोडक्यात

  • ‘बहीण लाडकी भाऊबीज देवाभाऊंची’ कार्यक्रम

  • लाडकी बहीण भाऊबीज देवाभाऊची , कार्यक्रमाचे स्थान व वेळ -

  • मुंबईच्या प्रत्येक जिल्ह्यात होणार सांस्कृतिक कार्यक्रम आणि मेळाव्याच आयोजन

मुंबई भाजपच्या वतीने आजपासून मुंबईच्या सहा जिल्ह्यात ‘बहीण लाडकी भाऊबीज देवाभाऊंची’ हे महिला सशक्तीकरणाचे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमामध्ये प्रसिद्धे गायीका वैशाली सामंत यांच्या गाण्यांचा कार्यक्रम होणार असून त्यानंतर जिल्ह्याचे ‘मातृ शक्ती’ मेळावे होणार आहेत. त्याबरोबरच ‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने शुक्रवारी मुंबईतील सहा ठिकाणी ‘वंदे मातरम’चे गायन होणार आहे, अशी अशी माहिती भाजपचे मुंबई अध्यक्ष व आमदार अमीत साटम यांनी दिली.

लाडकी बहीण भाऊबीज देवाभाऊची , कार्यक्रमाचे स्थान व वेळ -

१) ६ नोव्हेंबर २०५

उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा - शेर ए पंजाब, पालिका मैदान, अंधेरी पूर्व, सांयकाळी ६.३० वाजता.

२) ७ नोव्हेंबर २०५

दक्षिण मुंबई जिल्हा- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, भायखळा, सायंकाळी ६.३० वाजता.

३) ८ नोव्हेंबर २०२५

उत्तर मुंबई जिल्हा - सप्त मैदान विहार, पोईसर जिमखान्याच्या समोर, बोरीवली. सायंकाळी ६.३० वाजता.

४) ९ नोव्हेंबर २०२५

उत्तर मध्य मुंबई जिल्हा - खेरवाडी मैदान, वांद्रे पूर्व, सायंकाळी ६.३० वाजता.

५) १० नोव्हेंबर २०२५

दक्षिण मध्य मुंबई जिल्हा - गांधी मैदान, चेंबूर, सायंकाळी ६.३० वाजता.

६) ११ नोव्हेंबर २०२५

उत्तर पूर्व जिल्हा - प्रमोद महाजन मैदान, टँक रोड, भांडूप, सायंकाळी ६.३० वाजता.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा