ताज्या बातम्या

Blinkit-Airtel SIM : Self-KYC सेवा तात्पुरती बंद; एअरटेल-ब्लिंकिटच्या योजनेला DoT चा ब्रेक

एअरटेल-ब्लिंकिटची सिम सेवा तात्पुरती स्थगित; DoTच्या नियमांमुळे अडचण

Published by : Team Lokshahi

खाजगी टेलिकॉम सेवा पुरवणाऱ्या एका मोठ्या कंपनीने अलीकडेच एका डिलिव्हरी अ‍ॅपसोबत भागीदारी करत घरपोच सिम कार्ड देण्याची नवी सुविधा सुरू केली होती. या सेवेअंतर्गत ग्राहकांना काहीच मिनिटांत नवीन सिम त्यांच्या घरी मिळत होते. विशेष म्हणजे, ग्राहक स्वतःच डिजिटल ओळख पडताळणी करून(self-kyc) सिम सुरू करू शकत होते.

मात्र आता टेलिकॉम विभागाने या प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. ग्राहक अ‍ॅपच्या माध्यमातून सिम मागवत होते आणि काही वेळात ते त्यांच्या घरी पोहोचत होते. त्यानंतर मोबाईल अ‍ॅपद्वारे ओळख पडताळणी करून सिम सक्रिय केले जात होते. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणि स्टोअरला न जाता पार पडत होती. पण सुरक्षेच्या दृष्टीने यावर आक्षेप घेत टेलिकॉम विभागाने ही सेवा थांबवण्याचे निर्देश दिले आहेत.

भारतीय एअरटेल आणि ब्लिंकिट यांनी सुरू केलेली 10 मिनिटांत सिम कार्ड घरपोच देण्याची सेवा सध्या थांबवण्यात आली आहे. दूरसंचार विभागाने (DoT) केवायसी (KYC) प्रक्रियेबाबत चिंता व्यक्त केल्यामुळे ही सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे .

सेल्फ-केवायसी (self-kyc) म्हणजे काय?

सेल्फ-केवायसी ही एक डिजिटल प्रक्रिया आहे ज्याद्वारे ग्राहक आधार कार्ड किंवा डिजीलॉकरच्या माध्यमातून स्वतःची ओळख आणि पत्ता ऑनलाइन पडताळू शकतात. या प्रक्रियेमुळे ग्राहकांना सिम कार्ड मिळवण्यासाठी स्टोअरमध्ये जाण्याची आवश्यकता राहत नाही.

DoT ने सेवा का थांबवली?

DoT ने स्पष्ट केले आहे की, सिम कार्ड वितरित करण्यापूर्वी ग्राहकांची ओळख पडताळणी पूर्ण होणे आवश्यक आहे. एअरटेल-ब्लिंकिट मॉडेलमध्ये सिम कार्ड आधी वितरित केले जात होते आणि त्यानंतर ग्राहकांना 15 दिवसांच्या आत केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची मुभा होती. DoT ने या प्रक्रियेवर आक्षेप घेतला आहे .

मग आता पुढे काय?

एअरटेल सध्या त्यांच्या सिम वितरण प्रक्रियेत आवश्यक बदल करत आहे जेणेकरून ती DoT च्या नियमांनुसार सुसंगत होईल. सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे . सध्या ही सेवा थांबवण्यात आली असली तरी, ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली नाही. सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, एअरटेल आणि ब्लिंकिट ही सेवा पुन्हा सुरू करू शकतात .

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Manoj Jarange Patil : "मिळालेलं प्रमाणपत्र अंतरवालीत आणा, मला बघायचंय"; मराठवाड्यात वाटप झालेल्या कुणबी प्रमाणपत्रावर जरांगेंना संशय

Latest Marathi News Update live : उपेंद्र पावसकरला 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

Buldhana : मलकापूरजवळ भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू, पाच जखमी

Sanjay Raut : आनंद दिघे नेते, उपनेते नाही, तर...; शिंदेंच्या जाहिरातीवरुन राऊतांची टीका