ताज्या बातम्या

Megablock: पश्चिम रेल्वेवर दोन दिवस ब्लॉक, 'या' लोकल रद्द

पश्चिम रेल्वेवरील विरार-वैतरणादरम्यान पायाभूत कामासाठी 24 मे रोजी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Published by : Dhanshree Shintre

पश्चिम रेल्वेचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या विरार-डहाणु मार्गादरम्यान वैतरणा नदीच्या जवळ स्टीट गर्डर बसवण्याचे काम सुरू आहे. पश्चिम रेल्वेवरील विरार-वैतरणादरम्यान पायाभूत कामासाठी 24 मे रोजी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेच्या विरार-डहाणू रोड आणि डहाणू रोड-विरार लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तर, लोकल अंशत: रद्द केल्या आहेत.

विरार - वैतरणा विभागादरम्यान पूल क्रमांक 90 वर तुळई बदलण्याचे काम करण्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. शुक्रवारी रात्री 10:50 ते पहाटे 4:50 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. त्यामुळे, शनिवारी रात्री 9:20 वाजताची विरार-डहाणू रोड लोकल रद्द करण्यात आली आहे, त्याचप्रमाणे, रात्री 10:45 वाजता डहाणू रोड-विरार लोकलही रद्द करण्यात आली आहे. 25 मे रोजी पहाटे 4:40 वाजताची डहाणू रोड-चर्चगेट लोकल, सकाळी 06:05 वाजताची डहाणू रोड-चर्चगेट लोकल आणि पहाटे 5:25 वाजताची डहाणू रोड-पनवेल लोकल 50 मिनिटे उशिराने पोहोचतील.

दरम्यान, या कामामुळं ट्रेनचे वेळेपत्रक थोडे बिघणार आहे. पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार विरार-वैतरणा दरम्यान घेण्यात येणाऱ्या ब्लॉकमुळं पश्चिम रेल्वेवरील काही ट्रेनला फटका बसणार आहे. विरार-डहाणू प्रकल्पासाठी पश्चिम रेल्वेकडून वैतरणा नदीवर आणखी एक पुल बांधण्यात येत आहे. या ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेच्या विरार-डहाणू रोड आणि डहाणू रोड-विरार लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Adani Group : अदानी समूहाच्या कंपन्यांना सेबीकडून क्लीन चिट

Rohit Pawar : "कोर्टाची नोटीस मिळाल्यानंतर पाऊल उचलणार", कोकाटेंनी दिलेल्या मानहानीच्या नोटीसवर रोहित पवारांचं वक्तव्य

Gold Silver Rate : ग्राहकांची चिंता मिटली! लवकरच सोने-चांदीच्या भावात होणार मोठी घसरण; कधी ते जाणून घ्या

Chhagan Bhujbal : "अंतरवालीतील दगडफेक शरद पवारांच्या..." अंतरवालीतील दगडफेकीवर भुजबळांनी केला पडदाफाश