BMC Election 2026 dos and donts for voters on polling day what should avoid BMC Election 2026
ताज्या बातम्या

BMC Election 2026 : 29 पालिकांसाठी मतदान उद्या! मतदारांनी काय करावं, काय टाळावं? जाणून घ्या...

BMC Election 2026: राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी गुरुवारी, 15 जानेवारी रोजी मतदान होत आहे. तब्बल नऊ वर्षांनंतर होणारी ही निवडणूक असल्याने राजकीय वातावरण तापलेलं आहे.

Published by : Riddhi Vanne

BMC Election 2026 : राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी गुरुवारी, 15 जानेवारी रोजी मतदान होत आहे. तब्बल नऊ वर्षांनंतर होणारी ही निवडणूक असल्याने राजकीय वातावरण तापलेलं आहे. प्रचार थांबला असून आता सर्व जबाबदारी मतदारांची आहे. मतदानाच्या दिवशी काय लक्षात ठेवायचं, ते थोडक्यात जाणून घेऊया.

मतदानाला जाताना काय कराल?

ओळख पटवणारा कोणताही वैध दस्तऐवज सोबत ठेवा.

(आधार, पॅन, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, फोटोसह बँक पासबुक, पेन्शन कार्ड इ.)

मतदार यादीतील नावाची स्लिप जवळ ठेवा. नसेल तर केंद्रावर मिळते.

वेळेत मतदान केंद्रावर पोहोचा आणि रांगेत शिस्त पाळा.

मतदानावेळी काय टाळाल?

मोबाइल फोन आत नेऊ नका; नेलाच तर तो पूर्णपणे बंद ठेवा.

चाकू, लायटरसारख्या धोकादायक वस्तू जवळ बाळगू नका.

अफवा पसरवू नका, कुठल्याही चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका.

मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात प्रचारास मनाई आहे.

मतदानाच्या दिवशी गटाने प्रचार, एसएमएस किंवा डिजिटल प्रचार निषिद्ध आहे.

लोकशाही मजबूत करण्यासाठी तुमचं मत महत्त्वाचं आहे. शांततेत, निर्भयपणे मतदान करा आणि जबाबदार नागरिकत्व निभावा.

थोडक्यात

  1. मतदार ओळखपत्र (Voter ID) बरोबर ठेवा.

  2. रेषा, नियम, आणि पोलिंग वेळ पाळा.

  3. मतदान करताना नियम मोडू नका.

  4. सुरक्षित आणि सुरळीत मतदानासाठी पोलिसांचे मार्गदर्शन पाळा.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा