Uddhav Thackeray Shivsena Uddhav Thackeray Shivsena
ताज्या बातम्या

Uddhav Thackeray Shivsena : मोठी राजकीय घडामोड ; ठाकरे गटाला नवे बळ, माजी नगरसेवकाचा पक्षात प्रवेश

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली वेग घेत आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मुंबईत संघटन मजबूत करण्यावर भर दिला असून, त्याला नवे यश मिळाले आहे.

Published by : Riddhi Vanne

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली वेग घेत आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मुंबईत संघटन मजबूत करण्यावर भर दिला असून, त्याला नवे यश मिळाले आहे. एका माजी नगरसेवकाने थेट उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केल्याने ठाकरे गटाची ताकद वाढली आहे.

चंगेज मुलतानी ठाकरे गटात सहभागी

जोगेश्वरी पश्चिम विभागातील माजी नगरसेवक चंगेज मुलतानी यांनी आज ‘मातोश्री’ येथे आपल्या समर्थकांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे स्वागत केले. यावेळी आमदार हारुन खान, वर्सोवा मतदारसंघाचे समन्वयक बाळा आंबेरकर आणि अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

जोगेश्वरी पश्चिमेत संघटन वाढणार

मुलतानी यांच्या प्रवेशामुळे जोगेश्वरी पश्चिम भागात ठाकरे गटाचे संघटन अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे. 2017 च्या महापालिका निवडणुकीत त्यांनी प्रभाग क्रमांक 62 मधून अपक्ष म्हणून विजय मिळवला होता. आता पक्षात आल्यानंतर आगामी निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळू शकते, अशी चर्चा आहे.

महापालिका निवडणुकीचे वेळापत्रक

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. सध्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 15 जानेवारीला मतदान होणार असून, 16 जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.

दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीसाठी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. मराठी माणसाच्या हितासाठी ही युती करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. आता मुंबईकर कुणाला सत्तेची संधी देतात, हे निकालातून स्पष्ट होईल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा