देशातील सर्वाधिक उत्पन्न असलेल्या मुंबई महानगरपालिकेसाठी काल मतदान झाले होते. आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात होताच राजकीय चित्र झपाट्याने स्पष्ट होऊ लागले. जसजसा वेळ पुढे गेला, तसतशी मुंबईत भाजप आणि शिंदे गटाची बाजी मजबूत होताना दिसली.
सध्याच्या आकड्यानुसार भाजप–शिंदे युतीने 100 चा टप्पा ओलांडत 106 जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेची सत्ता त्यांच्या हाती जाण्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. दुसरीकडे, तब्बल दोन दशकांनंतर एकत्र आलेले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती अपेक्षेप्रमाणे यश मिळवू शकलेली नाही. त्यांना मिळून केवळ 64 जागांवर समाधान मानावे लागले आहे.
भाजपाने सर्वाधिक जागांवर आघाडी घेतली असून शिंदे गटानेही महत्त्वाची साथ दिली आहे. मनसे आणि ठाकरे गटाला मर्यादित यश मिळाले. मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर लढत दिली असली तरी ठाकरे बंधूंचा प्रभाव या निवडणुकीत फारसा जाणवला नाही. एकूणच, मुंबईच्या सत्तेवर आता भाजप–शिंदे युतीचा झेंडा फडकण्याचे संकेत स्पष्ट दिसत आहेत.
मुंबईतील विजयी उमेदवार
प्रभाग क्रमांक- 50 – भाजपचे विक्रम राजपूत विजयी
प्रभाग क्रमांक- 52 – भाजपच्या प्रीती साटम विजयी
प्रभाग क्रमांक – 33 काँग्रेसचे मोईन सिद्दिकी विजयी
प्रभाग क्रमांक – 1 शिवसेनेच्या रेखा यादव विजयी
प्रभाग क्रमांक – 135 भाजपचे नवनाथ बन विजयी
प्रभाग क्रमांक – 215 भाजपचे संतोष ढोले
प्रभाग क्रमांक – 214 भाजपचे अजय पाटील विजयी
प्रभाग क्रमांक – 19 भाजपचे प्रकाश तावडे विजयी
प्रभाग क्रमांक – 123 शिवसेना ठाकरे गटाचे सुनील मोरे विजयी
प्रभाग क्रमांक – 50 भाजपचे विक्रम राजपूत विजयी
प्रभाग क्रमांक – 20 भाजपचे दीपक तावडे विजयी
थोडक्यात
• देशातील सर्वाधिक उत्पन्न असलेल्या मुंबई महानगरपालिकेसाठी काल मतदान पार पडले.
• आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली.
• मतमोजणी सुरू होताच राजकीय चित्र झपाट्याने स्पष्ट होऊ लागले.
• जसजसा वेळ पुढे गेला, तसतशी मुंबईतील सत्ता संघर्षाची दिशा ठरू लागली.
• भाजप आणि शिंदे गटाची बाजी मजबूत होताना दिसू लागली.
• निकालांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.