ताज्या बातम्या

BMC Property Tax : मुंबईकरांसाठी मोठी बातमी! आता वाढीव मालमत्ता कर भरावा लागणार, किती ते जाणून घ्या....

मालमत्ता करात १५% ते २०% वाढ, रेडी रेकनर दरांमुळे मुंबईतील घरमालकांना अधिकचा कर भरण्याची वेळ.

Published by : Riddhi Vanne

स्वप्नांची नगरी असलेल्या मुंबईमध्ये प्रत्येकाला आपले स्वतःचे घर हवे असते. मुंबईमध्ये स्वतःचे घर घेणे म्हणजे त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. मात्र ज्या लोकांची मुंबई मध्ये स्वतःची घरे आहेत त्यांना आता अधिकचा वाढीव मालमत्ता कर भरावा लागणार आहे. रेडी रेकनरचे दर बदलामुळे मालमत्ता करामध्ये वाढ करण्यात आल्याचे मुंबई महानगर पालिकेने स्पष्ट केले आहे.

१० वर्षात पहिल्यांदा कर वाढ

रेडी रेकनरचे दरात बदल झाले की मालमत्ता करामध्ये ही बदल होतात. मालमत्ता कर हा रेडी रेकनर च्या दरावर अवलंबुन असतो.१० वर्षानंतर पहिल्यांदाच मार्च २०२५ मध्ये रेडी रेकनर चे दर ३.८८ टक्क्यांनी वाढले त्यामुळे मालमत्ता करामध्ये १५ ते २० टक्के वाढ होणार असुन याचा थेट परिणाम मुंबईतील ९ लाखांहून अधिक मालमत्ता मालकांवर होणार आहे.

मालमत्ता कर वाढ कोणाला भरावे लागणार

रेडी रेकनर चे दर वाढल्याने महानगर पालिका क्षेत्रातील सर्व मालमत्ता मालकांना वाढीव दर भरावा लागणार आहे. मात्र ५०० चौ. फुटांपेक्षा लहान घरांना यात वगळण्यात आल्याने मुंबईमधील सुमारे ३. ६ लाख नागरिकांवर या मालमत्ता वाढीचा काहीही परिणाम होणार नाही. याउलट बाकी मालमत्ता धारकांना मात्र अधिकचा मालमत्ता कर भरावा लागणार आहे.

मालमत्ता करामध्ये वाढ

मुंबई महानगरपालिकेच्या सांगण्यानुसार आताच्या मालमत्ता करात जास्तीत जास्त १३ ते १५ टक्के वाढ होणार आहे. मात्र काही भागात नागरिकांना ४० टक्क्यांपर्यंत वाढीव बिल आलेली आहेत. रेडी रेकनर च्या वाढत्या दरामुळे मालमत्ता करामध्ये ही वाढ झालेली आहे. मात्र मालमत्ता दर वाढल्यामुळे मुंबईकरांना अधिकचा मालमत्ता कर भरावा लागणार आहे. यासाठी महानगपालिकेने ३० जुन २०२५ ही अंतिम तारीख निश्चित केली असुन नागरिकांनी वेळेवर कर भरला तर या करामध्ये सुट मिळणार आहे. आणि निर्धारित वेळेनंतर जर बिल भरले तर विलंब शुल्क आकारले जाणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा