ताज्या बातम्या

Jain Mandir In Vileparle : 'त्या' अधिकाऱ्याची हकालपट्टी, जैन मंदिर तोडक कारवाईप्रकरणी आंदोलनानंतर पालिकेची कारवाई

मंदिर तोडक कारवाईनंतर निघालेल्या मोर्चानंतर महापालिका आयुक्त भूषण गगराणी नवनाथ घाडगे यांच्या हकालपट्टीचा आदेश काढण्यात आला.

Published by : Rashmi Mane

विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिर तोडक कारवाईप्रकरणी पालिकेचे विभाग वॉर्ड ऑफिसर नवनाथ घाडगे यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. मंदिर तोडक कारवाईनंतर निघालेल्या मोर्चानंतर महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी नवनाथ घाडगे यांच्या हकालपट्टीचा आदेश काढण्यात आला. वॉर्ड ऑफिसर नवनाथ घाडगे यांच्या आदेशाने पालिका कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने दिगंबर जैन मंदिरावर तोडक कारवाई केली होती. याच मंदिर तोडक कारवाई प्रकरणी जैन समाजाच्या लोकांनी विलेपार्लेपासून अंधेरी पूर्वमधील पालिकेच्या विभाग कार्यालयावर मोर्चा काढला होता. तसेच, त्याच जागी पुन्हा मंदिर उभारू, असे आश्वासन यावेळी महापालिकेच्या वतीने देण्यात आले आहे.

जैन समुदायाच्या आंदोलनानंतर महापालिकेने या अधिकाऱ्यावर कारवाई केली. मुंबईच्या विलेपार्ले पूर्व परिसरात दिगंबर जैन मंदिरावर पालिकेने तोडक कारवाई केली. त्याविरोधात विश्व हिंदू परिषद आणि जैन समाजाने धडक मोर्चा काढला. जैन मंदिरावर कारवाई केलेल्या वॉर्ड ऑफिसरवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पालिकेचे सहाय्यक आयुक्त म्हणून अंधेरी के/पूर्व विभागात नवनाथ घाडगे यांची दहा दिवसांपूर्वीच बदली करण्यात आली होती. आता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा