पावसाळ्यामध्ये मुंबईतील जलवाहतूक सेवा बंद असते. त्यानंतर पुन्हा २-३ महिन्यांपूर्वी मुंबईतील जलवाहतूक सुरू झाली आहे. गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा, गेट वे ते एलिफंटा या सेवा पुन्हा सुरू झाली. मात्र, एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटाला जाणारी एक प्रवाशी बोट बुडाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई पोलीस आणि भारतीय नौदल यांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे. निलकमल नावाची ही बोट असल्याची माहिती मिळत आहे. तसेच या बोटीत ३० प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
नेमकं काय घडलं?
अरबी समुद्रामध्ये गेट वे ऑफ इंडियावरून निघालेली बोट एलिफंटाकडे जात होती. यावेळी नेव्हीच्या बोटीची प्रवासी बोटीला जोरदार धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती की बोटीचे दोन तुकडे होऊन प्रवासी बस उलटली. नेव्हीच्या बोटीने धडक देतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. बोटीमधीस प्रवाशाने हा व्हिडिओ चित्रीत केला असल्याचं सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा-
या दुर्घटनेमध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर ६६ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. आणखी काही जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.