Dombivali MIDC Fire 
ताज्या बातम्या

डोंबिवली हादरली! MIDC मध्ये मोठा स्फोट झाल्यानं आगीचं तांडव; ८ जणांचा मृत्यू, ६० जखमी, रुग्णांना एम्स रुग्णालयात केलं दाखल

डोंबिवलीच्या एमआयडीसीत एका कंपनीत मोठा स्फोट झाल्याची घटना घडलीय. एमआयडीसीच्या फेज- २ मध्ये हा स्फोट झाल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Published by : Naresh Shende

Dombivali MIDC Blast Update : डोंबिवलीच्या एमआयडीसीत एका कंपनीत मोठा स्फोट झाल्याची घटना घडलीय. एमआयडीसीच्या फेज- २ मध्ये हा स्फोट झाल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्फोटाची भीषणता इतकी गंभीर आहे की, आकाशात धुराचे लोट आणि आगीचे लोळ मोठ्या प्रमाणात पसरले आहेत. या स्फोटामुळे अनेक जण जखमी झाल्याचं समजते आहे. कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याची माहिती समोर आलीय. या घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहेत. या स्फोटामुळे ८ जणांचा मृत्यू झाला असून ६० कामगार जखमी झाले आहेत. यापैकी २४ जणांना एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. ५ जण ऑरिंदम रुग्णालयात, तर नेपच्यून रुग्णालयात ९ जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

डोंबिवलीत एमआयडीसीत झालेल्या स्फोटाच्या घटनेबाबत भाजप आमदार रवींद्र चव्हाण ट्वीटरवर म्हणाले, डोंबिवली एमआयडीसी फेज-2 मध्ये केमिकल कंपनीत झालेला स्फोट ही अतिशय गंभीर बाब आहे. या स्फोटात जखमी झालेल्या रुग्णांवर होणाऱ्या उपचारांना यश यावे, अशी प्रार्थना ! अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. तरीही आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी कृपया घाबरु नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, हे आवाहन !

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा