बॉलिवूड अभिनेता गोविंदा आहुजा सध्या खुप चर्चेत आला आहे. त्याने आजवर अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. आजवर त्याच्या अभिनयाला चाहत्यांची खुप पसंती मिळाली आहे. गोविंदा त्यांच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच खासगी आयुष्यामुळेही तो अधिक चर्चेत आला आहे. गोविंदा व त्याची पत्नी सुनीता यांच्या नात्यामध्ये कटुता आल्याचे दिसून येत आहे. दोघांचाही 37 वर्षांचा संसार मोडणार असल्याच्या अनेक चर्चा आता सुरु आहेत.
गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता हे दोघंही गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळे राहतात. याबद्दलचा खुलासा सुनीता यांनी स्वतः एका मुलाखतीदरम्यान केला होता. त्यामुळे दोघंही घटस्फोट घेऊन वेगळे होणार आशा अनेक चर्चादेखील रंगल्या होत्या. या घटस्फोटाचे कारण गोविंदाचे विवाहबाह्य संबंध असल्याचेही बोलले जात आहे. त्याचे नाव एका 30 वर्षीय मराठी अभिनेत्रीबरोबर जोडलं जात आहे. मात्र ही अभिनेत्री नक्की कोण? याबद्दल मात्र कोणतीही माहिती समोर आली नाही.
घटस्फोटाच्या चर्चांवर गोविंदाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र याबद्दल काय खरं आणि काय खोटं? याबद्दल कोणतीही खात्रीशिर माहीती समोर आली नाही. यादरम्यान सुनीताची एक मुलाखत व्हायरल होताना दिसत आहे. या मुलाखतीमध्ये सुनीता म्हणाल्या होत्या की, "मला सध्या खुप असुरक्षित वाटते. वयाच्या 60 व्या वर्षांनंतरही लोक बदलतात. तो काय करत आहे हे मला माहीत आहे". गोविंदा आणि सुनीता 1987 साली लग्नबंधनात अडकले. त्यांना टिना आणि यशवर्धन अशी दोन मुलं आहेत.