ताज्या बातम्या

"नाना पाटेकरांनी 'त्या' निर्मात्याला भांडी घासायला लावली", परेश रावल यांचा गौप्यस्फोट

त्याचप्रमाणे परेश रावल यांनी मराठी कलाकारांमध्ये नाना पाटेकर यांचे विशेष कौतुक केले आहे.

Published by : Shamal Sawant

बॉलिवूड अभिनेते परेश रावल हे नेहमीच चर्चेत असलेले बघायला मिळतात. परेश रावल आणि मराठी मनोरंजन यांचं नातंदेखील तितकच खास असेललं बघायला मिळते. नुकतीच त्यांनी 'द लल्लनटॉप'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मराठी कलाकार, रंगभूमी तसेच संहिता याबद्दल भाष्य केले. त्यांनी यावेळी मराठी रंगभूमीबद्दल आदर व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे परेश रावल यांनी मराठी कलाकारांमध्ये नाना पाटेकर यांचे विशेष कौतुक केले आहे.

नाना पाटेकर यांनी भूमिकेसाठी मागितले 1 कोटी रुपये :

परेश रावल यांनी नाना पाटेकर यांची एक वेगळीच ओळख सांगितली आहे. भूमिकेसाठी त्या काळी 1 कोटी रुपये घेणारा एकमेव अवली नट असल्याचेही परेश रावल म्हणाले. "स्क्रिप्ट आवडली, तर एक रुपयातही काम करतील, पण नाही पटली तर कोट्यवधी रुपये दिले तरी नाही म्हणतील," असंही त्यांनी स्पष्ट केलं.

त्याचवेळी त्यांनी नाना पाटेकर यांचा अजून एक मजेशीर प्रसंग शेअर केला आहे. नानांनी एकदा एका प्रोड्यूसरला घरी जेवणासाठी बोलावलं. मटण जेवायला दिल्यावर नानांनी त्याला विचारलं, "खाऊन झालं? आता जा, भांडी धुवून टाक!"या प्रसंगावर हसत परेश रावल म्हणाले, "भाई, वो है नाना पाटेकर… बाप है वो!"

मराठी रंगभूमीचा आदर :

परेश रावल यांनी सांगितले की, "मराठी नाटकं एवढी प्रभावी असतात की, पडदा पडल्यावर प्रेक्षकांना सांगावं लागतं की हे लाईव्ह होतं, रेकॉर्डिंग नव्हे!"या वक्तव्याने मराठी रंगभूमीच्या ताकदीची पुन्हा एकदा पुष्टी झाली आहे. मराठी रंगभूमीचं प्रेम, नानाचा स्वभाव आणि अभिनयावरील निष्ठा या सर्व गोष्टी परेश रावल यांच्या या मुलाखतीतून अधोरेखित झाल्या आहेत. मराठी दोन पावलं पुढे आहे, कारण त्यांच्याकडे सशक्त लेखक आहेत असं मतही त्यांनी ठामपणे व्यक्त केलं.

परेश रावल यांनी मराठी नाटकांचा उल्लेख करत सुलभा देशपांडे, अरविंद देशपांडे आणि डॉ. श्रीराम लागू यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या अभिनयाची आठवण सांगितली. त्याचबरोबर, प्राजक्ता देशमुख यांचं ‘देवबाभळी’ हे नाटक आणि त्यामधून साकारलेली भक्तीभावनेची नाजूक मांडणी, विशेषतः संत तुकाराम आणि विठ्ठल भक्तीचा संदर्भ देत त्यांनी मराठी रंगभूमीच्या समृद्धतेचं कौतुक केलं.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Meenatai Thackeray Statue : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Latest Marathi News Update live : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींनी घाईघाईने निर्णय घेऊ नका, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Kiran Kale Shivsena UBT : ठाकरेंच्या शिवसेनेच्या किरण काळेंवर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?