बॉलिवूड अभिनेता सलमान खान काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपुर्वी सलमान खानच्या राहत्या घरी गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे दिवंगत नेते बाबा सिद्धीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षेवरुन चिंता व्यक्त केली जात होती. बाबा सिद्धीकी हे सलमान खानचे अत्यंत जवळचे मित्र म्हणून ओळखले जात होते. म्हणूनच त्याची हत्या बिष्णोई गँगने केली असं म्हटले जात आहे. त्यामुळे सलमान खानच्या जीवाला धोका असल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे सलमान खानच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. हे सर्व चर्चा सुरु असतानाच सलमान खानचा अंगरक्षक शेरा हा विधानभवनात दिसून आला. त्यामुळे या चर्चांना अधिकच उधाण आले आहे. शेराने राजकीय नेत्यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.
सलमान खान आणि बिष्णोई गँगमध्ये वैर का?
सलमान खान आणि कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई गँगमध्ये 1998 साली वैर सुरु झाले. राजस्थानमध्ये 'हम साथ साथ है' या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होते. या दरम्यान सलमान खानने दोन काळविटांची शिकार केली. सलमान खानने वन्य प्राण्यांची शिकार केल्याने तो कायद्याच्या कचाट्यात सापडला. 2018 रोजी सलमान खानला पाच वर्षांची शिक्षा सुनवण्यात आली होती. परंतु दोन दिवसात 50 हजार रुपयांच्या जामीनावर सलमान खान बाहेर आला. यासर्व प्रकरणामुळे लॉरेन्स बिष्णोई गँग सलमान खानवर राग असल्याची माहिती मिळत आहे.