बॉलिवूड अभिनेता सोनू सूदची पत्नी सोनाली सूद हिचा २४ मार्च रोजी नागपूर महामार्गावर भीषण कार अपघात झाला होता. यावेळी तिची बहीण आणि पुतण्या देखील त्याच्यासोबत कारमध्ये उपस्थित होते. सोनू सूदच्या पत्नीच्या अपघाताचे फोटोही समोर आले होते. गाडीची अवस्था पाहून सगळे घाबरले. अभिनेत्याच्या पत्नीची गाडी समोरून पूर्णपणे चुराडा झालेला दिसून आला. त्याचवेळी, आता सोनू सूदने एक व्हिडिओ जारी केला आहे आणि सोनाली सूद, तिची बहीण आणि पुतण्या या अपघातातून कसे वाचले याचा खुलासा केला आहे.
सोनू सूदने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडिओ संदेश शेअर केला आहे. यामध्ये अभिनेता गाडीत बसून चाहत्यांना इशारा देताना आणि त्यांच्या पत्नीच्या अपघाताची माहिती देताना दिसत आहे. त्याने एक महत्त्वाचा संदेश दिला आहे.सोनू सूद म्हणाला, "गेल्या आठवड्यात नागपूरमध्ये एक खूप मोठा अपघात झाला. ज्यामध्ये माझी पत्नी, तिचा पुतण्या आणि तिची बहीण गाडीत होते". तसेच "गाडीची अवस्था काय होती हे संपूर्ण जगाने पाहिले आहे. जर तिला कोणी वाचवला असेल तर ते सीट बेल्टनेच", असा सोनू सूदने पुढे खुलासा केला.
"मागे बसणारे लोक सहसा सीट बेल्ट लावत नाहीत. पण, त्या दिवशी नेमकं काय घडले? हे तुम्हालाही ऐकून आश्चर्य वाटेल. सोनू सूदने सांगितले की त्याच्या पत्नीने सीट बेल्ट लावला होता आणि 1 मिनिटानंतर अपघात झाला. तिघांचेही प्राण फक्त सीट बेल्ट लावल्यामुळे वाचले. मागे बसणाऱ्या 100 पैकी 99 लोक कधीही सीट बेल्ट लावत नाहीत. त्यांना वाटते की ही जबाबदारी फक्त समोर बसलेल्या व्यक्तीची आहे", त्यामुळे सोनू सुदने सगळ्यांनाच मोलाचा सल्ला दिला आहे.
सोनू सूद सध्या चित्रपटांपासून लांब असलेला दिसून येतो. मात्र तो अनेक सामाजिक कार्यांमध्ये अग्रेसर असतो. दरम्यान आता सोनू सूदची पत्नी बरी झाल्याची माहितीदेखील त्याने दिली आहे. सोनू सूदने व्हिडिओमार्फत मोलाचा संदेश दिला आहे.