बॉलिवूड अभिनेता सोनू सूद हा नेहमीच चर्चेत असतो. मात्र आता तो कोणत्याही चित्रपटामुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. सोनू सूदची पत्नी सोनालीचा समृद्धी महामार्गावर अपघात झाला आहे. या अपघातात ती गंभीर जखमी झाली आहे. याबद्दलची अजून सविस्तर माहिती समोर आली नाही.
समृद्धी महामार्गावर सोनाली सूद, तिची बहीण आणि मुलाबरोबर प्रवास करत होती. या अपघातामध्ये सोनाली आणि तिच्या बहिणीचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. कुटुंबातील जवळच्या व्यक्तीने सोनालीच्या अपघाताची माहिती दिली आहे . सध्या दोघांवरही नागपूर येथे उपचार सुरु आहेत. दरम्यान या अपघातामध्ये सोनालीची बहीण किरकोळ जखमी झाली आहे.
सोनालीच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर, सोनाली लाईमलाइटपासून खूप दूर असते. ती सामाजिक कार्यांमध्ये अग्रेसर असते. 1996 साली सोनू आणि सोनाली लग्न बंधनात अडकले. नागपूर विद्यापिठात तिचे एमबीएचे शिक्षण पूर्ण झाले. ती आता निर्माती म्हणूनही कार्यरत आहे.