सध्या कान्स फेस्टिव्हलची चर्चा सुरु आहे. यासाठी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावलेली दिसून आली. मात्र यासगळ्यामध्ये अभिनेत्री उर्वशी रौतेलाकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले गेले. उर्वशीने फाटलेला ड्रेस घातल्यामुळे तिच्याबद्दल अनेक चर्चा सुरु झाल्या. सोशल मीडियावर उर्वशीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना बघायला मिळाला.
कान्स 2025 मध्ये उर्वशीचा दुसऱ्या लूकचे अनेक फोटो आणि व्हिडिओ आता व्हायरल झाले आहेत. अभिनेत्रीने रविवारी कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर नाजा सादेचा अर्ध-शीअर ब्लॅक गाऊन परिधान केला होता आणि ती तिच्या डाव्या काखेजवळील ड्रेस फाटला होता यावर नेटिझन्सनी लक्ष वेधले आणि इतक्या मोठ्या व्यासपीठावर चुकीचा लूक कसा दिला याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तिचा सदर व्हिडीओ 'पिंकविला'ने शेअर केला आहे.
उर्वशीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिच्या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. "कान्समध्ये फाटलेला ड्रेस असलेली ती पहिली भारतीय आहे", असे एका नेटकऱ्याने लिहिले, तर दुसऱ्याने लिहिले की, "तिचे दुर्दैव आहे. प्रथम तिचा ड्रेस दारात अडकला, नंतर ती तो कार्पेटवर पोपट घेऊन आली, आता ती फाटलेल्या ड्रेसमध्ये आली. कान्समध्ये अनेक दुर्दैवांचा सामना करणारी पहिली भारतीय अभिनेत्री."असेही लिहिले.
उर्वशीनेही तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिच्या लूकचे फोटो शेअर केले आहेत. पण ते सर्व वेगळ्या अँगलने फोटो असलेले दिसून येत आहेत. तिने तिच्या ड्रेसचा फाटलेला भाग लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. याआधी, कान्स 2025 च्या उद्घाटन समारंभात उर्वशीला तिच्या "parrot" लूकसाठी ट्रोल करण्यात आले होते. तिने स्ट्रॅपलेस नेकलाइन आणि अनोख्या डिझाइनसह रंगीबेरंगी फिशटेल-स्टाईल गाऊन घातला होता आणि त्यात जुडिथ लीबर ब्रँडचा टियारा आणि क्रिस्टल पॅरट क्लच होता, ज्याची किंमत4.68 लाख रुपये होती.