बॉलीवूडची ड्रामा क्वीन राखी सावंतनं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. तिने थेट पाकिस्तानच्या नागरिकांना दिलासा देत 'मी तुमच्यासोबत' असल्याचं म्हटलं आहे. इतकंच नव्हे, तर राखीनं 'जय पाकिस्तान'चा नाराही दिला आहे. राखीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सध्या त्यावर नाराजीचे सूर उमटत आहेत. राखीच्या या व्हिडिओवर मनसेने आक्षेप घेत राखीविरोधात कारवाईची मागणी केली आहे. मनसे कार्यकर्ते अनिश खंडागळे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून राखीच्या या व्हिडिओवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
का म्हटलं आहे राखीने
"मी राखी सावंत आहे. फक्त खर बोलेन. खोट बोलणार नाही. पाकिस्तानवालो मी तुमच्यासोबत आहे. जय पाकिस्तान."
जम्मूतील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारत यांच्यात तणावपूर्वक परिस्थिती आहे. देशातील पाकिस्तानी कलाकारांना बॉयकॉट करण्यात यावं, अशी मागणी एकीकडे जोर धरू लागली आहे. यातच आता राखी सावंत यांनी पाकिस्तानला मी सोबत असल्याचे म्हटले आहे.
"देशात राहून काम केले आणि पाकिस्तानचा उधो उधो करत आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मनसेकडून राखी सावंत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे," असे मनसे कार्यकर्ता अनिश खंडागळे यांनी म्हटले आहे.