ताज्या बातम्या

Pahalgam Terrorist Attack : पहलगामच्या हल्ल्यावर बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकाची प्रतिक्रिया- "मला मुस्लीम असल्याची लाज वाटतेय..."

पहलगाम हल्ला: बॉलिवूड गायक सलीम मर्चंटची तीव्र प्रतिक्रिया- 'मला मुस्लीम असल्याची लाज वाटतेय...'

Published by : Team Lokshahi

जम्मू- काश्मीरच्या पहलगाम भागात काल मंगळवारी (22 एप्रिल) रोजी दुपारच्या सुमारास एकच खळबळ उडाली होती. देशाच्या अनेक भागातून आलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 28 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दहशतवादी हल्ल्यावर संपुर्ण देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यत अनेकांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या घटनेबाबत प्रसिद्ध बॉलिवूड गायक सलीम मर्चंटने एक पोस्ट शेअर केली आहे.

पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये सलीम म्हणतो की, "मला मुस्लिम असल्याची लाज वाटू लागली आहे. पहलगाममध्ये जे निर्दौष लोक मारले गेले, ते यासाठी मारले की ते हिंदू आहेत. मुस्लीम नाही. मग अतिरेकी मुस्लिम आहेत का? नाही ते दहशतवादी आहेत. कारण इस्लाम ही शिकवण देत नाही. कुराण शरीफच्या सूरह अल-बकराहच्या आयत 256 मध्ये म्हटलं गेलं आहे की धर्मात कोणतीही बळजबरी नसते. हे कुराण शरीफमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे."

पुढे व्हिडिओमध्ये सलीम म्हणतो की, "एक मुस्लीम असून मला हे सर्व पाहून लाज वाटतेय की निर्दोष हिंदू भावाबहिणींची निर्दयपणे हत्या करण्यात आली, कारण ते हिंदू आहेत. हे सर्व कधी संपणार? मागील दोन वर्षांपासून लोक खूप चांगल्याप्रकारे राहत होते. आता त्यांना पुन्हा समस्यांचा सामना करावा लागणार आहे. मी याबद्दल राग दुख व्यक्त करत आहे."

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Shrimant Yuvraj Sambhajiraje Bhosale : 'अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदे'च्या प्रदेशाध्यक्षपदी श्रीमंत युवराज संभाजीराजे भोसले यांची निवड

Chhatrapati Sambhajinagar : 35 वर्षांनंतर धक्का! PSI गफ्फार खान यांचे जात प्रमाणपत्र रद्द; पुढील वर्षी निवृत्तीपूर्वीच मोठा निर्णय

Latest Marathi News Update live : बुद्धिबळ विश्वविजेती दिव्या देशमुखचं नागपूरात स्वागत

Sanjay Raut In Rajya Sabha : 'पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा'; पहलगाम हल्ल्यावरून संजय राऊतांचा मोदींवर जोरदार हल्ला