ताज्या बातम्या

Amitabh Bachchan : आता दिवसातून फक्त 2 वेळा वाजणार; अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील सायबर कॉलरट्यूनमध्ये सरकारनं केला 'हा' बदल

सध्या सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आपल्याला दिसून येते. यामध्ये गुन्हेगारांना पकडणेही बऱ्याच वेळा शक्य होत नाही.

Published by : Team Lokshahi

सध्या सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आपल्याला दिसून येते. यामध्ये गुन्हेगारांना पकडणेही बऱ्याच वेळा शक्य होत नाही. याच पार्श्वभूमीवर सरकारने देशातील सर्व नागरिकांनी सतर्क राहावे, यादृष्टीने अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील प्रसिद्ध सायबर कॉलर ट्यून प्रत्येक नागरिकांच्या प्रत्येक डायल केलेल्या कॉलच्या आधी वाजवण्याची सुविधा सुरु केली. लोकांच्या फायद्यासाठी करण्यात आलेल्या या योजनेमुळे मात्र लोकांनाच त्रास होऊ लागला. याबाबतच्या तक्रारी लोकांकडून सातत्याने येत होत्या. याच पार्श्वभूमीवर सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता 'अमिताभ बच्चन' यांचा आवाज दिवसातून फक्त दोनदा ऐकू येणार आहे. सरकारने सायबर फ्रॉड अलर्टचा फॉर्म्युला बदलला आहे.

सायबर सुरक्षा जागृतीच्या आवाहनादरम्यान वाजवल्या जाणाऱ्या अमिताभ बच्चन यांच्या प्रसिद्ध सायबर कॉलरट्यूनमध्ये सरकारने मोठा बदल केला आहे. आता हा संदेश दिवसातून फक्त दोनदा ऐकला जाईल आणि आपत्कालीन कॉलवर ही कॉलरट्यून अजिबात वाजणार नाही. यासंदर्भात अलीकडेच अमिताभ बच्चन यांना ट्रोल ही केले गेले होते. तुम्ही रोज कोणाला फोन केला की प्रत्येक फोनच्याआधी अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील सायबर कॉलरट्यून वाजवली जायची. मात्र आता दिवसातून दोन वेळेलाच ही सायबर कॉलरट्यून वाजवली जाणार आहे. इमरजेंसी कॉल मध्ये (जसे की पोलिस, रुग्णवाहिका, अग्निशमन दल) ही सायबर कॉलरट्यून पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र (आय4सी) आणि सायबर दोस्त यांनी हा बदल केला आहे. सायबर दोस्त आय 4 सी नावाच्या अधिकृत एक्स हँडलवर याबाबत खुलासा करण्यात आला आहे.

"थांबा. विचार करा. कारवाई करा. ही केवळ एक धुन नाही, तर तुमच्या सुरक्षेचा संदेश आहे. आता तो दिवसातून फक्त दोन वेळा वाजेल, आपत्कालीन कॉलमध्ये नाही", असा संदेश दिला गेला आहे. सायबर कॉलरट्यून प्रत्येक कॉलदरम्यान ऐकवली जात असल्यामुळे अनेक लोक सोशल मीडियावर ती काढून टाकण्याची मागणी करत होते. यावर आता सरकारने हा मोठा बदल यामध्ये केला आहे.

या सायबर कॉलरट्यून संदर्भात काहींनी आरटीआयही दाखल केली होती. त्याचबरोबर लोकांची मागणी पाहता सरकारने हा महत्वाचा बदल या सायबर कॉलरट्यूनमध्ये केला आहे.

हेही वाचा

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा