Pakistan 
ताज्या बातम्या

Pakistan : पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यान बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांतात शनिवारी एका क्रिकेट सामन्यादरम्यान भीषण बॉम्बस्फोट झाला.

Published by : Team Lokshahi

थोडक्यात

पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट

एकाचा मृत्यू, अनेक जखमी

जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले

(Pakistan) पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांतात शनिवारी एका क्रिकेट सामन्यादरम्यान भीषण बॉम्बस्फोट झाला. बाजौर जिल्ह्यातील खार तालुक्यातील कौसर क्रिकेट मैदानात हा स्फोट घडला. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून मुलांसह अनेक जण जखमी झाले आहेत. अचानक झालेल्या या स्फोटामुळे मैदानात मोठी अफरातफरी माजली आणि प्रेक्षकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

या स्फोटात जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मृत आणि जखमींमध्ये प्रेक्षकांसह लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे स्थानिक नागरिक मोठ्या धक्क्यात आहेत.

दरम्यान, या स्फोटानंतर दहशतवाद्यांनी आणखी एक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी क्वाडकॉप्टरच्या सहाय्याने परिसरातील पोलीस ठाण्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा हल्ला अयशस्वी ठरला आणि मोठे नुकसान टळले. या सलग घटनांमुळे संपूर्ण परिसरात तणाव आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Chandrashekhar Bawankule : रोहित पवार यांच्या 'त्या' आरोपावर चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Latest Marathi News Update live : ओबीसी संघटनांची आज मुंबईत बैठक

E water taxi service : मुंबईत ई-वॉटर टॅक्सी सेवा 'या' तारखेपासून सुरू होणार

Mumbai Local : मुंबईला मिळणार वातानुकूलित 18 डब्यांची लोकल