Pakistan Explosion  
ताज्या बातम्या

Pakistan Explosion : पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये बॉम्बस्फोट; स्फोटात 31 ठार, 169 जण जखमी

पाकिस्तान स्फोटाने हादरलं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Pakistan Explosion) पाकिस्तान स्फोटाने हादरलं आहे. पाकिस्तानमधील या स्फोटात 31जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. इस्लामाबाद येथे नमाजाच्या वेळी एका शिया मशिदीत हा बॉम्बस्फोट झाल्याची माहिती मिळत असून यामध्ये 169 जण जखमी झाले आहेत.

जखमींना जवळच्या तीन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि सैन्याची टीम पोहोचली आहे. मशि‍दीच्या गेटवर येऊन हल्लेखोराला हा स्फोट घडवून आणल्याची माहिती मिळत आहे.

इस्लामाबादच्या शहजाद टाउन परिसरातील टेरलाई इमाम बारगाह येथे हा स्फोट झाला. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Summary

  • पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये बॉम्बस्फोट

  • स्फोटात 31 ठार, 169 जण जखमी

  • शुक्रवारी नमाजावेळी एका शिया मशिदीत झाला आत्मघाती हल्ला

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा