'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. दोन्ही देशांच्या सीमारेशेवर जोरदार हल्ले सुरु झाले. ज्यामुळे दोन्ही देशात तणावपुर्ण वातावरण निर्माण झाली आहे. अशातच भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशाची अर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील धार्मिक स्थळं, पिकनीक स्पॉट तसेच समुद्र किनारपट्टीवर नागरिकांना जाण्यास बंधी जाहीर केली गेली.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानच्या दहशदवाद्यांच मुंबईवर सावट आल्याचं पाहायला मिळालं आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत दोन दिवसात बॉम्ब ब्लास्ट होणार असल्याचा धमकीचा मेल आला आहे. डिझास्टर मॅनेजमेंट कंट्रोल रूमला हा धमकीचा मेल आला आहे. महाराष्ट्र नियंत्रण पोलिस कक्षाकडून मुंबई पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली आहे. याचपार्श्वभूमीवर सोमवार ते बुधवारदरम्यान सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.