ताज्या बातम्या

Pune : स्मशानभूमीजवळ बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने प्रचंड खळबळ

पुण्यातील मांजरी खुर्द स्मशानभूमीजवळ बॉम्ब सदृष्य वस्तू आढळून आल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

Published by : Shweta Chavan-Zagade

चंद्रशेखर भांगे, पुणे : पुणे (Pune) शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील मांजरी खुर्द स्मशानभूमीजवळ बॉम्ब सदृष्य वस्तू आढळून आल्या असल्याची माहिती समोर आली आहे. स्मशानभूमीजवळ एका नागरीकाला सर्व प्रथम ही वस्तू दिसली असून नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ सुरू झाली आहे. घटनास्थळी बॉम्ब शोधक पथक (Bomb Squad) आणि शहर पोलिस दाखल झाले. या ठिकाणी पोलिसांकडून वस्तू निकामी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

मांजरी खुर्द, पुणे येथील स्मशान भुमी शेजारी आण्णासाहेब मगर विद्यालयाच्या उजव्या बाजुला बाॅब सदृश वस्तु अभिमान रोहीदास गायकवाड यांच्या निदर्शनास आली. यावेळी पोलीस पाटील अंकुश उंद्रे व अशोक आव्हाळे यांना सांगितले असता पोलीस पाटील यांनी लोणीकंद पोलीस स्टेशनच्या पी आय गजानन पवार यांना संपर्क केला. तत्काळ मांजरी खुर्द येथे पोलीस पथक व बाॅब शोध पथक आले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात