ताज्या बातम्या

Mumbai : मुंबई आणि नागपूर न्यायालयांना बॉम्ब धमकी, पोलीस यंत्रणा सतर्क

राज्यातील अतिशय वर्दळीच्या ठिकाणांपैकी असलेल्या मुंबईतील वांद्रे न्यायालयाला आज ईमेलद्वारे स्फोटाची धमकी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे याच दिवशी नागपूरमधील जिल्हा न्यायालयालाही अशाच प्रकारचा धमकीचा मेल मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Published by : Riddhi Vanne

राज्यातील अतिशय वर्दळीच्या ठिकाणांपैकी असलेल्या मुंबईतील वांद्रे न्यायालयाला आज ईमेलद्वारे स्फोटाची धमकी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे याच दिवशी नागपूरमधील जिल्हा न्यायालयालाही अशाच प्रकारचा धमकीचा मेल मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दोन्ही ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा दावा करण्यात आल्यामुळे पोलीस प्रशासन तातडीने अॅक्शन मोडमध्ये आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज १८ डिसेंबर रोजी सकाळी वांद्रे न्यायालयाच्या अधिकृत ईमेलवर धमकीचा संदेश आला. त्यानंतर तात्काळ पोलीस पथके, बॉम्ब शोधक आणि निकामी करणारी टीम घटनास्थळी पोहोचली. संभाव्य धोका लक्षात घेऊन परिसराची बारकाईने तपासणी सुरू करण्यात आली असून सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे.

सुरक्षिततेच्या दृष्टीने न्यायालयातील कामकाज तात्पुरते थांबवण्यात आले. वकील, कर्मचारी आणि नागरिकांना बाहेर काढण्यात आले असून संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. सध्या कोणालाही आत-बाहेर जाण्याची परवानगी दिली जात नाही. दरम्यान, सायबर विभाग धमकीचा ईमेल कुठून पाठवण्यात आला याचा शोध घेत आहे.

दुसऱ्या बाजूला, नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयालाही बॉम्ब असल्याचा ईमेल प्राप्त झाला आहे. या मेलमध्ये न्यायालयीन इमारतीत स्फोट होणार असल्याचा दावा करण्यात आला होता. यानंतर स्थानिक पोलिसांनी तत्काळ परिसराचा ताबा घेत तपास सुरू केला. आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू सापडलेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष रोशन बागडे यांनी सांगितले की, न्यायालयाच्या ईमेल आयडीवर सकाळी धमकीचा मेल आला होता. या मेलमध्ये सिव्हिल लाईन्स भागातील इमारतीत स्फोटके लावल्याचा उल्लेख होता. सध्या बॉम्ब शोधक पथक संपूर्ण परिसराची तपासणी करत असून, न्यायालयातील सुरक्षेची व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. या दोन्ही घटनांमुळे राज्यातील न्यायालयीन परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस यंत्रणा पूर्णपणे सतर्क आहे.

थोडक्यात

  • राज्यातील अतिशय वर्दळीच्या ठिकाणांपैकी असलेल्या मुंबईतील वांद्रे न्यायालयाला आज ईमेलद्वारे स्फोटाची धमकी देण्यात आली आहे.

  • विशेष म्हणजे याच दिवशी नागपूरमधील जिल्हा न्यायालयालाही अशाच प्रकारचा धमकीचा मेल मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

  • दोन्ही ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा दावा करण्यात आल्यामुळे पोलीस प्रशासन तातडीने अॅक्शन मोडमध्ये आले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा