ताज्या बातम्या

Mumbai Stock Exchange Bomb Threat : मुंबई स्टॉक एक्सचेंज इमारत बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क

मुंबई शेअर बाजाराला बॉम्ब धमकी: सुरक्षा यंत्रणा सतर्क, परिसराची कसून तपासणी

Published by : Team Lokshahi

देशाच्या आर्थिक राजधानीत भीतीचे वातावरण निर्माण करणारी एक गंभीर घटना समोर आली आहे. मुंबई शेअर बाजाराला (BSE) बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याचा दावा करण्यात आला असून, यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

सुरक्षा यंत्रणांनी तत्काळ या प्रकरणाची दखल घेत बॉम्ब शोध पथक (Bomb Detection and Disposal Squad) आणि डॉग स्क्वॉडने परिसरात कसून तपासणी सुरू केली आहे. शेअर बाजारातील व्यवहारात काही काळ अडथळा निर्माण झाला असला तरी, परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्राथमिक तपासात ही धमकी ई-मेलच्या माध्यमातून देण्यात आली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या सायबर क्राइम विभागाकडे सोपवण्यात आला आहे.

सध्या कोणताही स्फोटक पदार्थ सापडलेला नाही, मात्र संपूर्ण इमारत आणि आसपासचा परिसर तात्काळ रिकामा करून सुरक्षित करण्यात आला आहे. सुरक्षा यंत्रणा आणि पोलीस दल अत्यंत गंभीरतेने तपास करत आहेत. या घटनेनंतर मुंबईतील महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा