ताज्या बातम्या

Chandrapur Municipal Corporation : चंद्रपूर महापालिकेत धानोरकर आणि वडेट्टीवार दोन्ही गटाला अडीच-अडीच वर्षे....

चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत गुरुवारी संपली.

Published by : Varsha Bhasmare

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत गुरुवारी संपली असून, या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात सत्तासंघर्ष अधिक तीव्र झाला आहे. काँग्रेसमधील अंतर्गत वादावर अखेर दिल्लीतील हायकमांडने तोडगा काढल्याचा दावा करण्यात येत आहे. या तोडग्यानुसार, महापौरपदाचा कार्यकाळ अडीच-अडीच वर्षांचा ठेवण्यात येणार असून, पहिल्या अडीच वर्षांसाठी खा. प्रतिभा धानोरकर गटाला तर उर्वरित अडीच वर्षांसाठी आ. विजय वडेट्टीवार गटाला महापौरपद दिले जाणार आहे. या फॉर्म्युल्यानुसार, गटनेतेपद मात्र विजय वडेट्टीवार गटाकडेच राहणार आहे. त्यासाठी राजेश अडूर यांच्या नावाची शिफारस वडेट्टीवार यांनी केल्याची माहिती आहे. काँग्रेसमधील हा सत्ता-संतुलनाचा प्रयत्न स्थानिक पातळीवरील नाराजी कमी करण्यासाठी करण्यात आल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, स्थायी समितीचे सभापतीपद शिवसेना (ठाकरे गट) कडे राहणार असल्याने महाविकास आघाडीतील समन्वय महत्त्वाचा ठरणार आहे.

मात्र, काँग्रेसमधील वाद अद्याप पूर्णतः शमला नसल्याचे चित्र आहे. वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांनी विभागीय आयुक्तांच्या आदेशाविरोधात नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. गट नोंदणीबाबत काही त्रुटी असल्याचे सांगत आयुक्तांनी पूर्तता करण्याचे निर्देश दिले होते. याच निर्देशांना आव्हान देत ही याचिका दाखल करण्यात आली असून, या प्रकरणाची सुनावणी १९ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यामुळे महापौर निवडणुकीपूर्वी न्यायालयीन घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, १० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी भाजपानेही जोरदार तयारी सुरू केली आहे. काँग्रेस सत्तास्थापनेच्या हालचाली करत असतानाच भाजपाने आपले उमेदवार जाहीर करून राजकीय गणिते बदलण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपाकडून महापौर पदासाठी संगीता खांडेकर, तर उपमहापौर पदासाठी संजय कंचर्लावार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी यासंदर्भातील अधिकृत पत्र जारी केले आहे. भाजपाच्या उमेदवारीतही अंतर्गत सत्ता-संतुलन साधण्याचा प्रयत्न दिसून येतो. उपमहापौर पदासाठी किशोर जोरगेवार यांच्या समर्थकाला, तर महापौर पदासाठी सुधीर मुनगंटीवार यांच्या समर्थकाला संधी देण्यात आल्याची चर्चा आहे. यामुळे भाजपातील विविध गटांमध्ये समन्वय राखण्याचा प्रयत्न पक्ष नेतृत्वाने केल्याचे मानले जात आहे.

या पार्श्वभूमीवर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. “चंद्रपूर महानगराचा विकास व्हावा आणि भाजपाला महापौरपद मिळावे यासाठी काँग्रेसमधील आमचे मित्रच प्रयत्न करत आहेत. आमचे गणित सुटत असून आमचाच महापौर बनेल,” असा दावा त्यांनी केला. तसेच, “आमची कोणासोबतही थेट चर्चा झालेली नाही, मात्र समोरच्यांची आमच्यासोबत चर्चा सुरू आहे. ११ फेब्रुवारीला नेमकी कुणासोबत चर्चा झाली हे स्पष्ट होईल,” असे सूचक विधानही त्यांनी केले. एकीकडे काँग्रेसचा अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला, तर दुसरीकडे भाजपाचे आक्रमक डावपेच — या सगळ्या घडामोडींमुळे चंद्रपूर महापालिकेतील सत्ता कुणाच्या हाती जाणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

  • चंद्रपूर महापालिकेत सत्ता-संघर्ष: काँग्रेसचा अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला, भाजपही मैदानात

  • महापौरपदासाठी काँग्रेसचा तोडगा, भाजपाचे गणित बिघडणार का?

  • चंद्रपूर महापालिका: दिल्ली हायकमांडचा फॉर्म्युला आणि भाजपाचे आक्रमक डावपेच

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा