बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमचा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. जॉनचा 'द डिप्लोमॅट' प्रदर्शित झाला आहे. मात्र प्रदर्शनानंतर हा चित्रपट फारशी कमाल करताना दिसत नाही आहे. मात्र अशातच विकी कौशलचा छावाची जादू मात्र अजूनही दिसून येत आहे. या वीकेंडला दोन्ही चित्रपटांनी किती कमाई केली? याबद्दल आता माहिती आपण जाणून घेऊया.
जॉन अब्राहमचा 'द डिप्लोमॅट' हा चित्रपट खऱ्या घटनेवर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये जॉनने साकारलेल्या भूमिकेला चाहत्यांची खूप पसंती मिळाली आहे. त्याचप्रमाणे या चित्रपटामध्ये सादिया खतीबने साकारलेली भूमिकादेखील प्रेक्षकांच्या अधिक पसंतीस पडत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवम नायरने केले आहे. या चित्रपटाची कथा चांगली असतानाही हा चित्रपट मात्र बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करु शकला नाही.
रवीवरी या चित्रपटाने 4 कोटी रुपये कमाई केली. मात्र तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने चार कोटी 65 लाख रुपयांची कमाई केली. त्यामुळे आतापर्यंतची चित्रपटाची कमाई केवळ 13.3 कोटी रुपये झाली आहे. दरम्यान नवीन चित्रपट येऊनदेखील 'छावा' जादू अजूनही तशीच दिसून येत आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने 31 व्या दिवशी 8 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह चित्रपटाची एकूण कमाई 562.65 कोटींवर पोहोचली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत हिंदीमध्ये 548.7 कोटी रुपये आणि तेलुगूमध्ये 13.95 कोटी रुपयांची कमाई केली आहे.