Murder in Lodge Team Lokshahi
ताज्या बातम्या

प्रेयसीला लॉजवर नेऊन केली हत्या, नंतर प्रियकरानंही घेतली रेल्वे समोर उडी

कळंब समुद्र किनाऱ्यावरील एका लॉजमध्ये घडलेल्या या घटनेचा तपास करताना पोलिसांच्या समोर धक्कादायक गोष्टी आल्या आहेत.

Published by : Team Lokshahi

नालासोपारा | संदीप गायकवाड :

कळंब समुद्र किनाऱ्यावरील एका लॉजमध्ये अल्पवयीन तरुणीची प्रियकराने गळा आवळून हत्या (Crime) केल्याची घटना घडली आहे. एवढ्यावरच न थांबता प्रियकराने स्वत: बोरीवलीमध्ये (Borivali) येऊन रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. नालासोपारा (Nalasopara) पश्चिमेच्या कळंब येथील हर्षद फार्म हाऊस या लॉज मध्ये बुधवारी ही घटना घडली आहे.

अभिषेक शहा असे आरोपी प्रियेकराचं नाव असून, हर्षदा गोसावी असं हत्या झालेल्या अल्पवयीन प्रेयसीचं नाव आहे. आरोपी प्रियकरानं बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास आपल्या अल्पवयीन प्रेयसीला कळंबच्या हर्षद फार्म हाऊस येथे घेऊन आला होता. काही वेळाने तो जेवण आणण्यासाठी बाहेर गेला मात्र परतलाच नाही. लॉज मालकाने खोलीत जाऊन पाहिले तेव्हा त्याची प्रेयसी मृतावस्थेत पडली होती. आरोपी अभिषेकने गळा आवळून तिची हत्या करून फरार झाल्याचे स्पष्ट होताच लॉज मालकाने अर्नाळा सागरी पोलिसांना याची माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून, मृतदेह ताब्यात घेतला. अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला. आरोपीच्या शोधासाठी दोन पथकं रवाना केले असता फरार प्रियकर आरोपीने बोरिवली रेलवे स्थानकाजवळ रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याचं उघड झालं आहे.

अभिषेक त्याच्या प्रेयसीला अश्लील फोटोच्या आधारे ब्लॅकमेल करत पैशाची मागणी करत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. प्रेयसीने मंगळवारी घरातून १५ हजार रुपये घेतले होते, आणि त्यानंतर हे जोडपे लॉजवर आले होते. पण लॉजवर आल्यानंतर असं काय घडलं की, काय झालं की प्रेयसीची हत्या करून, प्रियकराने आत्महत्या केली हे मात्र स्पष्ट झालं नाही. पोलीस सध्या या गोष्टीचा शोध घेत आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा