Amol Mitkari Team Lokshahi
ताज्या बातम्या

ब्राह्मण समाजची खिल्ली उडवली, अमोल मिटकरी विरोधात समाज आक्रमक

मिटकरींच्या विरोधात घोषणाबाजी

Published by : Vikrant Shinde

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) ह्यांनी भर सभेमध्ये राज ठाकरे (Raj Thackeray Mimicry) ह्यांची नक्कल करत मग, हनुमान चालीसा व हनुमान स्तोत्रही बोलून दाखवले. ह्या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही (Jayant Patil) उपस्थित होते.

ह्या भाषणादरम्यान, मिटकरी ह्यांनी मंत्रोच्चार करून ब्राह्मण समाजाची खिल्ली उडविल्याचा आरोप करत आता ब्राह्मण सामाज मिटकरींविरोधात आक्रमक झालेला पाहायला मिळतोय. जालन्यामध्ये ब्राम्हण समाजानं राष्ट्रवादी आमदार मिटकरींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.

अमोल मिटकरी ह्यांनी उडवलेल्या खिल्लीमुळे समस्त ब्राम्हण समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यानंतर, जालन्यात ब्राम्हण समाजाची एक बैठक झाली आणि या बैठकीनंतर अमोल मिटकरींविरोधात घोषणाबाजी करत त्यांचा निषेध करण्यात आला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा