ताज्या बातम्या

Lokshahi Marathi Sanwad 2025 : राजकीय नेते, उद्योजक आणि विचारवंतांच्या उपस्थितीत रंगणार उत्तर महाराष्ट्राच्या विकासाचे महत्त्वपूर्ण चर्चासत्र! 'उत्तर महाराष्ट्र संवाद 2025' पाहा आज फक्त लोकशाही मराठीवर

लोकशाहीच्या या व्यासपीठवर आज उत्तर महाराष्ट्रच्या विकासाचा संवाद रंगणार आहे, आणि या कार्यक्रमात गुणवंतांचा गौरव केला जाणार आहे.

Published by : Prachi Nate

"LOKशाही मराठीसोबत पुढे जाऊया, प्रगती करूया, आपला उत्तर महाराष्ट्र पुढे नेऊया" लोकशाहीच्या या व्यासपीठवर आज उत्तर महाराष्ट्रच्या विकासाचा संवाद रंगणार आहे. या कार्यक्रमात गुणवंतांचा गौरव केला जाणार आहे. लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे आणि दीपक बिल्डर अ‍ॅंड डेवलपर्स प्रस्तुत "उत्तर महाराष्ट्र संवाद 2025" या कार्यक्रमाचे आयोजन एक्सप्रेस रॉयल हॉल, हॉटेल एक्सप्रेस इन, नाशिक येथे करण्यात आले आहे. 

Live TV Access

या कार्यक्रमाला आज सकाळी 10:30 वाजल्यापासून सुरवात होणार असून या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत पाहुणे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात महाराष्ट्राचं राजकारण, सत्ताकारण, समाजकारण, पर्यटन, आरोग्य आदींसह सांस्कृतिक क्षेत्राबद्दल चर्चा केली जाणार आहे. या सह उत्तर महाराष्ट्रच्या भूमीतून आलेल्या दिग्गज मान्यवरांचा सत्कार या कार्यक्रमात केला जाणार आहे.

उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि उत्तर महाराष्ट्राच्या भविष्यासाठी राजकीय नेत्यांची ध्येयधोरणे काय असतील यावर सविस्तर माहिती या कार्यक्रमात मांडली जाणार असून. उत्तर महाराष्ट्राच्या भविष्यासाठी राजकीय नेत्यांचं उद्योजकांच व्हिजन काय आहे? तसेच उत्तर महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप पुढे कसा असणार आहे, हे या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेतलं जाणार आहे.

या कार्यक्रमाला

महाराष्ट्र राज्य अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ,

महाराष्ट्र राज्य जलसंधारण मंत्री गिरीश महाजन,

महाराष्ट्र राज्य जलसंपदा मंत्रीराधाकृष्ण विखे-पाटील,

महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे,

महाराष्ट्र राज्य पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील,

महाराष्ट्र राज्य क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे,

महाराष्ट्र राज्य अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ

आणि महाराष्ट्र शासन पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल उपस्थित राहणार आहेत.

या दैदीप्यमान सोहळ्यात उत्तर महाराष्ट्राच्या वेगवान विकासाचं व्हिजन आणि उत्तर महाराष्ट्राच्या प्रगतीचा संवाद ऐकण्यासाठी आज सकाळी 10:30 वाजल्यापासून पाहा दीपक बिल्डर अ‍ॅंड डेवलपर्स प्रस्तुत "उत्तर महाराष्ट्र संवाद 2025" फक्त लोकशाही मराठी न्यूजवर...

Live TV Access

Co-Powered By - Shabari Naturals

Accoiciate Sponcers - Saraswat Bank, PRM Software Solution Pvt Ltd

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Wasim Akram On Ind vs Pak : Asia Cup 2025 अंतिम सामन्यापूर्वी वसीम अक्रमची भारताच्या बाजूने भविष्यवाणी; पाकिस्तानी खेळाडूंना दिला 'हा' सल्ला

Tamil Nadu Stampede : विजयची सहा तास उशिरा एन्ट्री; करूरमध्ये 39 मृत्यू कशामुळे?

Latest Marathi News Update live : मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघरला रेड अलर्ट

America : TikTok : अमेरिकेत टिकटॉक सुरूच राहणार