Notice issued to Chief Minister Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. राज्यात मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना पहिलीपासून हिंदी भाषा अप्रत्यक्षरित्या सक्तीची करण्यावरून राज्यात वादंग सुरू आहे. याचपार्श्वभूमीवर, महाराष्ट्राची आणि मराठी माणसांची फसवणूक करणे, हिंदी सक्तीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देऊन खोटे बोलणे.
राज्यपालांनी दिलेल्या संविधानिक शपथेचा भंग करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटिस बजावण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी सात दिवसात नोटीसीला उत्तीर्ण दिल्यास महाराष्ट्रातील लहान बालकाच्या हक्कासाठी मराठी माणसाचा मराठी भाषेचा प्रश्न म्हणून सरकार पुरस्कृत भाषा अत्याचाराच्या विरोधात न्यायालयात दाद मागणार असं असीम सरोदे म्हणाले आहेत.