ताज्या बातम्या

ST Bus Driver : एसटी बस चालकांसाठी ‘ब्रेथ अँनालायझर’ अनिवार्य

पुणे एसटी महामंडळाने आपल्या बस सेवेत सुरक्षा वाढवण्यासाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. महामंडळाच्या नवीन 5000 बसगाड्यांमध्ये ‘ब्रेथ अँनालायझर’ बसवले जाणार आहेत,

Published by : Varsha Bhasmare

थोडक्यात

  • एसटी बस चालकांसाठी ‘ब्रेथ अँनालायझर’ अनिवार्य

  • मद्यपान करणारा चालक गाडी सुरू करू शकणार नाही

  • एसटीच्या नवीन बसगाडय़ांत ‘ब्रेथ अ‍ॅनालायझर’ बसवणार

पुणे एसटी महामंडळाने आपल्या बस सेवेत सुरक्षा वाढवण्यासाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. महामंडळाच्या नवीन 5000 बसगाड्यांमध्ये ‘ब्रेथ अँनालायझर’ बसवले जाणार आहेत, जे सुनिश्चित करेल की मद्यपान केलेला चालक बस चालवू शकणार नाही.

या यंत्रणेअंतर्गत, प्रत्येक चालकाला बसचे स्टेअरिंग हातात घेण्यापूर्वी ब्रेन अँनालायझरच्या यंत्रासमोर फुंकर मारावा लागणार आहे. जर चालकाने मद्यपान केले असेल, तर त्वरित यंत्राने हे ओळखले जाईल आणि बस स्टार्ट होणार नाही. अशा परिस्थितीत मद्यपान केलेल्या चालकाला बस चालवण्यापासून रोखून लगेच घरी पाठवले जाईल. त्याच दिवशी त्या चालकाला कामावरही दांडी लागणार नाही.

एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अगदी नवीन बसगाड्यांपासून सुरुवात करून ही यंत्रणा लागू करण्यात येणार आहे. आतापर्यंत 400 नवीन बसगाड्या महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत आणि आणखी 3000 बसगाड्या लवकरच मिळणार आहेत. या सर्व 5000 बसगाड्यांमध्ये ब्रेथ अँनालायझर बसवला जाईल.

सुरक्षा उपायांचा आणखी एक भाग म्हणजे चालकाच्या केबिनमध्ये बसवलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून मद्यपान केलेल्या चालकावर तत्काळ कारवाई केली जाईल. त्यामुळे महामंडळाच्या म्हणण्यानुसार, बस प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आता कोणत्याही प्रकारच्या मद्यपानावर शून्य सहिष्णुता पाळली जाणार आहे.

एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, “प्रवाशांची सुरक्षितता हे आमचे प्रथमिक ध्येय आहे. मद्यपान केलेला चालक बस चालवण्यापासून रोखणे आणि तत्काळ योग्य ती कारवाई करणे यासाठी ब्रेथ अँनालायझर हा एक प्रभावी उपाय ठरणार आहे.”

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा