ब्रिटिश महाराणी क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांचं आज वृद्धपकाळानं निधन झालं. त्या मागील काही काळापासून आजारी असल्याचे सांगण्यात येत आहे. महाराणी क्वीन एलिझाबेथ या 96 वर्षांच्या होत्या. ब्रिटिश सत्तेचा सुवर्णकाळ आणि अस्ताला जाणाऱ्या साम्राज्याच्या साक्षीदार असलेल्या क्वीन एलिझाबेथ सात दशके सर्वाधिक काळ ब्रिटिश राजघराण्याच्या सिंहासनावर विराजमान होत्या.
या वृत्ताला ब्रिटीश राजघराण्याकडून आणि ब्रिटन सरकारकडून दुजोरा देण्यात आला आहे. एलिझाबेथ यांच्या पश्चात चार अपत्ये, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. एलिझाबेथ यांच्या निधनानंतर आता प्रिन्स चार्ल्स हे ब्रिटनच्या गादीवर बसतील. एलिझाबेथ यांच्या निधनानंतर सर्वच जगातून शोक व्यक्त होत आहे.
ब्रिटेन सोबत या इतर अन्य ठिकाणच्या देखील होत्या त्या महाराणी
एलिझाबेथ या फक्त ब्रिटनच्या महाराणी नाहीत. ब्रिटीश राष्ट्रकुल परिषदेतील कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जमैका, बार्बाडोस, बहामास, ग्रेनेडा, पापुआ न्यू गिनी, सॉलोमन बेट समूह, तुवालू, सेंट लुसिया, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स, बेलिझ, ॲंटिगा आणि बार्बुडा, व सेंट किट्स आणि नेव्हिसया या 16 देशांची महाराणी होत्या.