छत्रपती संभाजीनगरमध्ये आज 'बीआरएस'ची भव्य सभा होणार आहे. भारतीय राष्ट्र समिती पक्षाचे राष्ट्रीय पातळीवर विस्तार करण्यासाठी केसीआर यांच्याकडून प्रयत्न सुरु आहे. तर याची सुरुवात महाराष्ट्रातून आणि त्यातल्या त्यात मराठवाड्यातून करण्यात येत आहे.
माजी आमदार अण्णासाहेब माने, राष्ट्रवादीचे नेते संतोष माने, राष्ट्रवादीचे नेते प्रदीप सोळुंके शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी, फेरोज पटेल, माजी आमदार हर्षवर्धन जाधव, राष्ट्रवादीचे नेते कदीर मौलाना यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे.
संध्याकाळी 6 वाजता या सभेला सुरुवात होणार आहे. सभेच्या परिसरात मोठ्याप्रमाणावर होर्डिंग लावण्यात आले आहे. शहरातील बीड बायपास रोडवरील जाबिंदा मैदानावर या सभेचं आयोजन करण्यात आला आहे.