ताज्या बातम्या

धक्कादायक! बारामतीत बापाकडून मुलाची निर्घृण हत्या

बारामतीच्या धुमाळवाडीतील धक्कादायक घटना

Published by : shweta walge

बारामती तालुक्यातील धुमाळवाडी परिसरातील अहिल्यानगर येथे बापाकडून पोटच्या मुलाचा निर्घृणपणे खून केल्याची घटना घडली.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर येथील लालासाहेब धोंडीबा कोकरे व मुलगा गणेश लालासाहेब कोकरे यांच्यात घरगुती वादावरून भांडण झाले.

या भांडणात वडील लालासाहेब कोकरे यांनी गणेशच्या डोक्यात गज घालून हत्या केली. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. घटनास्थळी माळेगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण अवचर यांनी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. दरम्यान, खूनाची कबुली लालासाहेब कोकरे यांनी दिली असल्याचे किरण अवचर यांनी सांगितले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pune : पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणातील पाच आरोपींना अटक

Asia Cup : भारत-पाकिस्तान सुपर-4 मध्ये पुन्हा आमनेसामने

Latest Marathi News Update live : राज्यात आज ॲलोपॅथी डॉक्टरांचा संप

EVM : आता ईव्हीएम मशीनवर दिसणार रंगीत छायाचित्र; केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय