BSNL Plan's New Prepaid Plan; will Directly Compete with Airtel-Jio BSNL Plan's New Prepaid Plan; will Directly Compete with Airtel-Jio
ताज्या बातम्या

'या' कंपनीचा नवा Prepaid Plan; थेट एअरटेल-जिओला मिळणार टक्कर

BSNL Plan's New Prepaid Plan; will Directly Compete with Airtel-Jio : बीएसएनएलचा नवा प्लॅन: एअरटेल-जिओला थेट टक्कर, 40% स्वस्त

Published by : Riddhi Vanne

थोडक्यात

खासगी कंपन्या ग्राहकांसाठी नवीन ऑफर्स घेऊन येतात.

आता मात्र सरकारी क्षेत्रातील बीएसएनएलही मागे राहिलेली नाही.

कंपनीने नुकताच ग्राहकांसाठी खास असा नवा प्लॅन बाजारात आणला आहे.

BSNL New Plan : मोबाईल वापरकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी खासगी टेलिकॉम कंपन्या सातत्याने नवीन ऑफर्स आणतात. मात्र आता सरकारी क्षेत्रातील बीएसएनएलही मागे राहिलेली नाही. कंपनीने नुकताच ग्राहकांसाठी खास असा नवा प्लॅन बाजारात आणला असून त्यामुळे एअरटेल, जिओ आणि व्हीआयला थेट स्पर्धा मिळत आहे.

बीएसएनएलचा हा नवा प्रीपेड प्लॅन केवळ 225 रुपयांचा असून त्याची वैधता 30 दिवस आहे. किंमत आणि फायदे या दोन्ही दृष्टीने हा प्लॅन खासगी कंपन्यांपेक्षा जवळपास 40 टक्के स्वस्त ठरतो. एअरटेल आणि व्हीआयचे समान कालावधीचे प्लॅन 399 रुपयांना मिळतात, म्हणजे बीएसएनएल ग्राहकांना तब्बल 174 रुपयांची बचत मिळते.

या प्लॅनमध्ये ग्राहकांना बीआयटीव्ही सेवा उपलब्ध होते. यामध्ये 350 पेक्षा जास्त लाईव्ह टीव्ही चॅनेल्स आणि विविध ओटीटी अॅप्सचा फायदा घेता येतो. त्यामुळे कमी किमतीत संपूर्ण मनोरंजनाचा पॅकेज ग्राहकांना मिळतो.

नेटवर्क सुधारणा आणि तंत्रज्ञानाच्या आघाडीवर बीएसएनएलही वेगाने काम करत आहे. कंपनीने देशभरात स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित 4जी सेवा सुरू केली असून सध्या 9 कोटींहून अधिक ग्राहकांना ही सेवा मिळत आहे. याशिवाय, बीएसएनएल लवकरच 5जी सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी 97 हजार 500 हून अधिक नवीन मोबाइल टॉवर्स उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे.

कंपनीच्या या नवीन प्लॅनमुळे स्वस्तात अधिक सुविधा मिळत असल्याने खासगी टेलिकॉम कंपन्यांवर दबाव निर्माण होऊ शकतो. ग्राहकांसाठी हा पर्याय अधिक किफायतशीर ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिवृष्टीचा तडाखा; शेतपिके व फळबागांचे प्रचंड नुकसान

India vs Pak Final 2025 : शिवसेनेच्या विरोधानंतर PVR चा मोठा निर्णय

Russia And Ukraine War : रशियाचा युक्रेनच्या राजधानीवर थेट प्रहार, युद्धात मोठी घडामोड?

डाएटमध्ये डेझर्ट खायचं असेल तर कोणते हेल्दी ऑप्शन?