बारामतीत गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार तक्रारी करून देखील कचरा गाडी न आल्याने बहुजन समाज पार्टी (बसपा) प्रदेश सचिव काळूराम चौधरी यांनी थेट कचरा घेत नगरपरिषद गाठली. त्यांनी चक्क नगरपरिषदेत कचरा टाकत संताप व्यक्त केला. काळूराम चौधरी यांनी नगरपरिषदेतील नागरिक सुविधा केंद्र विभागात जाऊन कचऱ्याने भरलेल पोतं जमिनीवर रिकामं केलं. यावेळी त्यावेळी संताप व्यक्त करताना ते म्हणाले की, अनेकदा तक्रारी करून देखील कचरा उचलण्यासाठी कोणी येत नाही. आम्ही लाख-लाख रुपये कर भरतो. मात्र बेसिक सुविधा मिळत नाही. तसेच आणखी कचरा नगरपरिषद कार्यालयात टाकला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
हेही वाचा